हे तर करंट नसलेले सरकार : आमदार राहुल आहेर यांची टीका - Nashik MLA Rahul Aher Criticizes State Government over electricity Supply | Politics Marathi News - Sarkarnama

हे तर करंट नसलेले सरकार : आमदार राहुल आहेर यांची टीका

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 डिसेंबर 2020

शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा होणे महत्वाचे असतांना महावितरणने अन्यायकारक भारनियमन लादले आहे. ते रद्द करत कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, नवीन सुधारित वेळापत्रक करावे अशी मागणी भाजपच्या वतीने येथील पाच कंदीलजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले

देवळा : वायर आणि बल्ब असला तरी करंट नाही. करंट नसलेले हे सरकार आहे. फसव्या घोषणा करणारे हे सरकार आहे. असा घणाघात आमदार डॉ. राहुल आहेर यांनी महाविकास आघाडीवर केला.

शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा होणे महत्वाचे असतांना महावितरणने अन्यायकारक भारनियमन लादले आहे. ते रद्द करत कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, नवीन सुधारित वेळापत्रक करावे अशी मागणी भाजपच्या वतीने येथील पाच कंदीलजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी आमदार डॉ.आहेर बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. 

येथील भागात सध्या कांदालागवड जोरात सुरू आहे. परंतु महावितरण कंपनीने १ डिसेंबर पासून नवीन वेळापत्रक केल्याने शेतीच्या दृष्टीने ते चुकीचे आहे. या पार्श्वभूमीवर दिवसा वीजपुरवठा व्हावा असे नियोजन तातडीने व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या फसव्या घोषणांचा निषेध करण्यात आला. आमदार डॉ.राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी स्वतः घोषणा देत या आंदोलनाला धार दिली.

शिवाय आपल्या भाषणातून महाविकास आघाडीवर आगपाखड केली. तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, सुनील देवरे, अण्णा शेवाळे, केदा शिरसाठ, दादाजी बोरसे यांनीही मनोगते व्यक्त केलीत. "हक्काची वीज दिवसा मिळालीच पाहिजे", "वीजबिल माफी झालीच पाहिजे" अशा घोषणा देत आणि वायर व शॉक बलब दाखवत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. 

तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, कार्यकारी अभियंता एस.पी.भोये, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, पुंडलिक आहेर, भाऊसाहेब पगार, अशोक आहेर, दिलीप पाटील, दयाराम सावंत, शहराध्यक्ष अतुल पवार, कौतिक पवार, संभाजी आहेर, दिनकर आहेर, किशोर आहेर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, तालुकाध्यक्ष दिशांत देवरे, नदिश थोरात, संजय मोरे, प्रवीण मेधणे, दयाराम सावंत, विलास निकम, भास्कर पवार, शशिकांत निकम, प्रदीप आहेर, मुन्ना अहिरराव, नानू आहेर, समाधान आहेर, अंबादास मांडवडे, दिलीप शिवले, शंकर निकम, विकास ठाकरे, दिलीप जोंधळे, दयाराम पगार, विजय सूर्यवंशी, मनेश ब्राम्हणकर, विलास देवरे, सुनील सावंत, अतुल देवरे, जिजाऊ निकम, शेरान शेख, गोपी मणियार यांच्यासह  पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभाग घेतला. 

Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख