लस उपलब्ध असताना राज्य सरकार नागरिकांच्या जीवाशी का खेळत आहे? - MLA Suresh Bhole criticizes the state government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

लस उपलब्ध असताना राज्य सरकार नागरिकांच्या जीवाशी का खेळत आहे?

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 मे 2021

लस उपलब्ध असताना सुद्धा महाविकास आघाडी सरकार नागरिकांच्या जीवाशी का खेळत आहे?

जळगाव : राज्यात ८.३२ लाख लसी उपलब्ध आहेत, तरीही लसीकरण बंद करून आघाडी सरकार जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप भाजपचे आमदार व जळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष सुरेश भोळे (Suresh Bhole) यानी केला आहे. (MLA Suresh Bhole criticizes the state government)

सुरेश भोळे यांनी या संदर्भात ट्विट केले आहे, ते म्हणतात, ''महाराष्ट्रात अद्यापही 8.32 लाख लसी उपलब्ध आहेत. तरीही राज्यात अनेक लसीकरण केंद्रांवर उन्हात थांबून लस मिळेल या आशेवर वाट पाहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध नाही असे सांगितले जात आहे. लस उपलब्ध असताना सुद्धा महाविकास आघाडी सरकार नागरिकांच्या जीवाशी का खेळत आहे? राज्यातील आघाडी सरकारवर आरोप करताना भोळे यांनी भाजप सह इतर राज्यातील लस उपलब्ध असल्याची आकडेवारी नकाशाच्या मध्यांमातून दाखवली आहे.

पुण्यातील लॅाकडाऊन कधी संपणार? याचे उत्तर आहे या आकड्यात!

दरम्यान, लस उपसब्ध नसल्यामुळे राज्यातील अनेक लसीकरण (Vaccination) केंद्र बंद आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी राज्यातील उपलब्ध लस आणि केंद्र सरकारकडून पुरवण्यात येणाऱ्या लशीच्या साठ्याची माहिती दिली. टोपे म्हणाले, ''१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण ही सध्या सुरु आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षांपुढील नागरिकांची जबाबदारी घेतली आहे. मात्र, राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. आता अनेकांना दुसरा डोस द्यायचा आहे, त्यांची संख्या ५ लाखांच्या जवळपास आहे. 

त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य सरकारने खरेदी केलेले कोव्हॅक्सिन आहे, ते पावणेतीन लाखांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचबरोबर केंद्राकडून आलेले ३५ हजार, असे मिळून तीन ते सव्वातीन लाख कोव्हॅक्सिनचे लसीचे डोस ४५ वर्षापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

पोटनिवडणुकीत कोरोना होऊन शिक्षकासह चौघांना गमावलेल्या माने कुटुंबीयांस फडणवीसांचा फोन

''१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी आलेले लसीचे डोस ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी वापरा, अशी सूचना सर्व लसीकरण केंद्रांना देण्यात आली आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस राहिला आहे, असे नाही. तर कोविशिल्डचे सुद्धा १६ लाख डोस केंद्र सरकारकडून यायचे राहिलेले आहेत. याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांना ही माहिती दिली. पण त्यांच्याकडे लस उपलब्ध नाही. त्यामुळे राज्याने खरेदी केलेली लस केंद्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वापरावी लागत, असल्याचे टोपे यांनी सांगितले. 

या संदर्भात टास्क फोर्सची चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, टास्क फोर्सशी चर्चा करून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण काही दिवसांसाठी कमी वेगाने करण्यासंदर्भात सूचना केली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख