कोठडीतील संगतीत आमदार चव्हाणांपुढे चोरट्याने उलगडला आपला जीवनपट

आमदाराची निवांत वेळ मिळणे सामान्यांसाठी दुरापास्त. त्यामुळे या चोरट्यालाही रात्रभर 'आमदार 'झाल्यासारखेच वाटले.
 MLA Mangesh Chavan .jpg
MLA Mangesh Chavan .jpg

जळगाव : शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नावर महावितरणच्या अधिकाऱ्यास खुर्चीला बांधल्या प्रकरणी अटकेत असलेले भारतीय जनता पक्षाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना, कोठडीत थेट घरफोडीतील सराईत चोरट्यासोबत संगत करावी लागली. आमदाराची निवांत वेळ मिळणे सामान्यांसाठी दुरापास्त. त्यामुळे या चोरट्यालाही रात्रभर 'आमदार 'झाल्यासारखेच वाटले. 

संबंध महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या पवन ऊर्फ भुऱ्या आर्य (वय ३३, रा. इंदूर) याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला मंगळवार ( ता. ३० मार्च) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यातच महावितरण कंपनीच्या कार्यालयात अधीक्षक अभियंत्यास खुर्चीला बांधून शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांना ३१ सहकाऱ्यांसह अटक झाली होती. एकटे आमदार एमआयडीसी पोलिस कोठडीत पवन ऊर्फ भुऱ्यासोबत, तर आमदारांचे सहकारी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याच्या कोठडीत होते. 

कोठडीतील असाही अनुभव 

मध्य प्रदेशातील इंदूर, खंडवा, भोपाळसह महाराष्ट्रात औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक गुजरातमध्ये सुरत अशा तिन्ही राज्यांत जवळपास ४० पोलिस ठाण्यांच्या कोठड्यांमध्ये पवनचे वास्तव्य राहिले आहे. जळगावातही त्याला तेच सर्व अपेक्षितच मिळाले. मात्र, आमदारासोबत त्याला दोन दिवसांचा सहवास लाभला.  त्या विषयी पवनला विचारले असतो तो म्हणाला, ‘साहब वो, बडे लोग है (असे, म्हणतच थांबला), लेकिन मुझसे अच्छेसे बात करते थे, क्यो करते हो. ये सब ऐसा भी पुछते थे. मैने सब सच बताया,’ असे पवनने सांगितले. 

मध्य प्रदेशातील कुख्यात कमल राठोड याच्या सहवासात येऊन इंदूरच्या रामकृष्ण बाग कॉलनीतील पवन ऊर्फ भुऱ्या गुन्हेगारीत आला. ज्या-ज्या कारागृहात राहिला तेथे त्याने प्रत्येक वेळेस नव्या गुन्हेगारांबरोबर गँग बनविली. मोठ्या घरफोड्यांसाठी एक आलिशान कार आणि दोन साथीदार त्याला हवे असतात. छेाट्याशा हातभर टॉमीने ३० सेकंदांत लॉक तोडून आत शिरल्यावर अवघ्या अर्ध्याच तासात घर उलथापालथ करून मिळालेला किमती ऐवज चोरून पळण्यात तो निष्णात आहे. प्रत्येक गुन्ह्यात मालामाल झाल्याचे तो सांगतो. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com