दिलासाजनक : मालेगाव कोरोनामुक्तीकडे...७३५ रुग्णांना दिला डिस्चार्ज; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

मालेगावात प्रशासन व नागरीकांच्या समन्वयातून त्रिस्तरीय उपाययोजना केल्या जात आहेत. या शहरातील कोरोना रिकव्हरी रेट सर्वाधीक ७३ टक्के आहे. सध्या येथे शंभरपेक्षाही कमी रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली
Nashik Collector Suraj Mandhare Explains Malegaon Corona Situtation
Nashik Collector Suraj Mandhare Explains Malegaon Corona Situtation

नाशिक : मालेगावात प्रशासन व नागरीकांच्या समन्वयातून त्रीस्तरीय उपाययोजना केल्या जात आहेत. या शहरातील कोरोना रिकव्हरी रेट सर्वाधिक ७३ टक्के आहे. सध्या येथे शंभरपेक्षाही कमी रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

''मालेगावचे व्यवस्थापन करताना रोजगार, आजाराचे व्यवस्थापन व अन्न धान्याची व्यवस्था या तिन्ही आघाड्यावर प्रशासन काम करीत आहेत. ही सुखावह बाब आहे. खासगी डॉक्टरांनी देखील आपले दवाखाने सुरू केले आहेत. या सर्व सकारात्मक गोष्टी पाहता मालेगाव लवकरच पूर्ववत होईल. त्याच दरम्यान ज्या स्वयंसेवी संस्था प्रशासनासोबत काम करीत आहेत. त्या सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की, जास्तीत जास्त मदत त्यांनी करावी व ती मदत देखील पुढे पोहचविण्याचे प्रयत्न प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहेत," असे श्री.मांढरे यांनी सांगितले.

नवीन डिस्चार्ज पॉलिसी परिणामकारक

याबाबत श्री. मांढरे म्हणाले, ''येथील कोरोना व्यवस्थापनाबद्दल सर्वच पातळीवर एक चिंता होती. परंतु आता एक चांगली गोष्ट अशी दिसून येत आहे की, कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण हळूहळू कमी होतांना दिसत आहे. जिल्ह्याचा विचार केला तर हजाराचे पुढे रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी ७३५ रुग्णांना आपण डिस्चार्ज दिला आहे. ज्यांचे उपचार अतिशय योग्य प्रकारे झाले असे ७३५ लोक सुखरुप घरी गेले आहेत. घरी गेलेल्या लोकांपैकी आतापर्यंत कुणीही पुन्हा रुग्णालयात परत आली नाही. तसेच या संबंधित व्यक्तींच्या घरच्या लोकांनाही लागण झालेली नाही किंवा ते पॉझिटीव्ह आले नाहीत. त्यामुळे हे पेंशट अतिशय व्यवस्थितरित्या बरे झालेले आहेत. लक्षणे नसलेल्या लोकांना घरी सोडायचे ही नवीन डिस्चार्ज पॉलिसी खरोखर अतिशय चांगली परिणामकारक सिध्द झाली आहे," 

पाॅवरलूम सुरु होणे शक्य

मालेगावातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी व सेवाभावी संस्था आणि नागरिक यांच्या अभूतपूर्व सहकार्यातून  कोरोना नियंत्रणासाठी यशस्वी व्यवस्थापन करण्याची क्षमता सिद्ध झाली असून, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मालेगावच्या पाॅवरलूमचा खडखडाट सुरू होईल, अशी शक्यता श्री. मांढरे यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ''कोरोना केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये रुग्णांचे मनोधैर्य टिकून राहण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी काही संस्था प्रशासनाला सहकार्य करीत असून, त्यांच्या माध्यमातून तिथल्या आहाराची व इतरही आवश्यक बाबींची व्यवस्थित काळजी घेण्यात येत आहे. प्रशासन म्हणून काम करीत असतांना स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधींनी व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केल्याने या महामारीतही व्यवस्थापन उत्तमरित्या करू शकलो आहोत,"

मालेगावचा डबलिंग रेट कमी

''मालेगावचा रुग्ण डबलींग रेट अतिशय कमी झाला आहे. १५ एप्रिल २०२० रोजी हा डबलिंग रेट २.२ दिवस होता दर तिसऱ्या दिवशी पेंशट डबल होत होते. आज जवळपास एक महिन्यानंतर पेंशट डबल होत आहे. गेल्या दोन तीन दिवसात कुणीही पेंशट मालेगावमधे दिसले नाही. प्रशासनाच्यावतीने एक मोठी सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात येत आहे. यात ह्दयविकार मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या तापमानाची नोंद घेणार आहोत, त्यामध्येही नागरिकांनी आम्हांला सहकार्य करावे,'' असे आवाहन श्री. मांढरे यांनी केले आहे.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com