जळगाव महापालिकेचे क्वारटांईन सेंटर फुल्ल, नवीन जागेच्या शोधासाठी गिरीश महाजन मैदानात

जळगाव शहरात ‘कोरोना’चा संसर्ग वाढत आहे. शहरात १२७२ रूग्ण असून त्यात १६९ पॉझीटीव्ह आहेत.
girissh-mahajan
girissh-mahajan

जळगाव : ‘कोरोना’चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जळगाव शहरात मंगळवार (ता. ८) पासून सात दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला. मात्र तरीही संसर्ग कमी होत नसल्याचे दिसत आहे.

जळगाव महापालिकेने सुरू केलेले शासकीय तंत्रनिकेतनचे क्वारंटाईन सेंटर फुल्ल झाले असल्याने आता नवीन जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन हे आता मैदानात उतरून सर्व पाहणी करीत आहेत.

जळगाव शहरात ‘कोरोना’चा संसर्ग वाढत आहे. शहरात १२७२ रूग्ण असून त्यात १६९ पॉझीटीव्ह आहेत. महापालिकेतर्फे जळगावातील शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतीगृहात क्वारंटाईन सेंटर करण्यात आले आहे. या ठिकाणी तीन इमारती आहेत. मात्र आता या तीनही इमारती फुल्ल झाल्या आहेत. या ठिकाणी आता रूग्णांसाठी जागा नाहीत. त्यामुळे आता नवीन जागांचा शोध सुरू करण्यात आला आहे. 

जळगावच्या महापौर भारती सोनवणे व त्यांचे पती नगरसेवक कैलास सोनवणे स्वत: या सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहेत. जळगाव महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. महापालिका निवडणूकीत गिरीश महाजन यांनी जळगाव शहर विकासाची हमी घेतली होती.

जळगाकरांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवून भरभरून तब्बल ५७ नगरसेवक निवडून दिले होते. जळगाव शहरात ‘कोरोना’रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा संसर्गरोखण्यासाठी तसेच रूग्णांच्या सुविधासाठी माजी पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजनही स्वत: मैदानात उतरले आहेत. 

त्यांनी जळगावाम महापालिकेतर्फे सुरू असलेल्या क्वारंटाईन सेंटरला भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत, महापालिका आयुक्त डॉ.सतीश कुळकर्णी उपस्थित होते. यावेळी त्यांनी शहरातील नवीन जागेबाबतही चर्चा सुरू केली आहे.

आयटीआय.चे वसतीगृहात रूग्णांची सुविधा करण्यात आली आहे.आता बांभोरी येथील इंजिनिअरींग कॉलेजचे वसतीगृह, तसेच आश्रमशाळेच्या इमारतीतह रूग्णांची सुविधा करण्याबाबत विचार करण्यात आला आहे. त्या दृष्टीने ताबडतोब उपाययोजना करण्यचा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com