बायको महापौर तर नवरा विरोधी पक्ष नेता; महापालिकेत अनोखे राजकारण 

शिवसेनेने आता भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे घेरण्याची तयारी सुरू केली आहे.
Jayshree Mahajan, Sunil Mahajan.jpg
Jayshree Mahajan, Sunil Mahajan.jpg

जळगाव : महानगरपालिकेला नवरा, बायको दोघे शिवसेनेतर्फे (Shiv Sena) निवडून आले आहेत. आताही दोघे शिवसेनेत आहेत. पण बायको शिवसेनेची महापौर तर नवरा शिवसेनेचाच विरोधी पक्ष नेता आहे. जळगाव महापालिकेतील अनोख्या राजकारणाची पहिली महासभा उद्या ( ता.१२) मेला होणार आहे. (In Jalgaon Municipal Corporation, the wife is the mayor and the husband is the Leader of Opposition)

जळगाव महापालिकेत नुकतेच सत्तांतर झाले भारतीय जनता पक्षाचे (BJP) नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्ता मिळवली. यात शिवसेनेच्या जयश्री महाजन (Jayshree Mahajan) या महापौर झाल्या. महापालिकेत विरोधी पक्ष नेते पद शिवसेनेकडे होते. महाजन यांचे पती सुनील महाजन विरोधी पक्ष नेते होते ते आजही आहेत. त्यामुळे एकाच घरात महापालिकेतील महापौर आणि विरोधी पक्षनेता ही दोन्ही पदे आहेत.

जळगाव महापालिकेत २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७५ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला ५७ जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला १५ आणि एमआयएम पक्षाला तीन जागा मिळाल्या, त्यामुळे भाजप सत्ताधारी तर शिवसेना विरोधी पक्ष होता. अडीच वर्षांनी महिला राखीव असलेल्या महापौर पदासाठी निवडणूक लागली अन याच ठिकाणी मोठे उलटफेर झाले. भाजपचे तब्बल ३० नगरसेवक फुटले तर एमआयएमने ही शिवसेनेला पाठिंबा दिला आणि शिवसेनेकडे सत्ता आली.

शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांच्या पत्नी महापौर झाल्या. तर तांत्रिक बाबीत शिवसेनेकडे विरोधी पक्ष नेते पद आहे, त्यामुळे सुनील महाजन हेच विरोधी पक्ष नेते आहेत. सत्तांतर झाल्यानंतर जळगाव महापालिकेची पहिली महासभा ऑनलाईन उद्या होणार आहे. पत्नी महापौर जयश्री महाजन व्यासपिठावर असतील तर पती सुनील महाजन विरोधी पक्षनेते असतील. भारतीय जनता पक्षाने आद्यापही विरोधी पक्ष नेते पदाचा दावा केलेला नाही.

शिवसेना महासभेत घेरणार हे विषय 

शिवसेनेने आता भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे घेरण्याची तयारी सुरू केली आहे. उद्याच्या महासभेत घरकुल प्रकरणात दोषी असलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका व्यापारी संकुलातील गळ्यांचा प्रश्न निकाली काढून भाजपला शह देण्याची खेळी शिवसेना करु शकते. तसेच, शिवसेनेच्या नगरसेवकाच्या प्रभागात अधिक निधी विकासाला देऊन भाजपची कोंडी करण्यात येणार आहे, असल्याने उद्याची सभा ही वादळी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com