त्यांनी तारीख कळवावी आम्ही त्यांचे काय फोडू हे त्यांना समजेल! 

प्रसाद लाड यांच्या सारख्या व्यापाऱ्याच्या मुखातून शिवसेना भवन फोडण्याचे शब्द शोभत नाहीत.
Gulabrao Patil, Prasad Lad .jpg
Gulabrao Patil, Prasad Lad .jpg

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड  (Prasad Lad) यांच्या सारख्या व्यापाऱ्याच्या मुखातून शिवसेना भवन फोडण्याचे शब्द शोभत नाहीत, आणि हिम्मत असेल तर प्रयोग करून बघा, आम्ही तुमचे काय फोडू हे त्यांना समजेल, असे आव्हान शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिले आहे. (Gulabrao Patil criticizes BJP MLA Prasad Lad) 

लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याच्या वादग्रस्त विधानावर बोलताना पाटील म्हणाले, राज्यात सत्तांतर होईल असे भाजपला वाटले परंतु ते होत नसल्याचे दिसत असल्याने आता काहीही करून वातावरण विस्कळीत करण्याचा हा प्रकार आता सुरू आहे, मागेही काही कारण नसताना भाजपचे लोक शिवसेना भवनावर चालून आले होते. आताही प्रसाद लाड शिवसेना भवन फोडण्याची भाषा करीत आहेत, त्यांना आपले आव्हान आहे, त्यांनी तारीख कळवावी आम्ही त्यांचे काय फोडू हे त्यांना समजेल. त्यांच्या सारख्या व्यापारी माणसाला हे शब्द शोभत नाहीत, असेही पाटील म्हणाले.  

लाड काय म्हणाले...
 
प्रसाद लाड यांनी रात्री उशिरा आपल्या फेसबुकवरून याविषयीचे स्पष्टीकरण दिले. ''प्रसारमाध्यमांतून माझ्या भाषणाचा विपर्यास करून मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या दिसत आहेत. मात्र, मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिले जाईल. मात्र, ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. शिवसेना प्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी कोणतेही वक्तव्य केले जाणार नाही'' असे त्यांनी सांगितले.  

दरम्यान, आपल्याला काय म्हणायचे होते, याबाबत लाड यांनी दावा केला आहे. ''माझे असे म्हणणे होते की आम्ही माहीममध्ये येतो, तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. त्या वाक्याचा विपर्यास करून जे काही दाखवण्यात आले आहे, त्यावर माझे हे स्पष्टीकरण आहे. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता'' असे लाड यांनी म्हटले आहे.

आपल्या विधानाबद्दल प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ''जर मी कुणाचे मन दुखावले असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असेही ते म्हणाले आहेत.पण, यासोबतच, आपल्या व्हिडीओमध्ये घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिले जाईल असे देखील लाड यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com