गिरीश महाजनांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाब 

जळगाव जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात उपचार सुविधाही ढासळत आहेत. जळगाव जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना आज (4 जुलै) दुपारचे जेवण सायंकाळी पाचपर्यंतही मिळाले नव्हते. त्यामुळे माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन संतप्त झाले.
Girish Mahajan was angry that Corona patients did not get food
Girish Mahajan was angry that Corona patients did not get food

जळगाव : जळगाव जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात उपचार सुविधाही ढासळत आहेत. जळगाव जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना आज (4 जुलै) दुपारचे जेवण सायंकाळी पाचपर्यंतही मिळाले नव्हते. त्यामुळे माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन संतप्त झाले. त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. 

जळगाव जिल्ह्यात "कोरोना' रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही संख्या कमी होण्यासाठी चांगल्या उपचार तसेच रुग्णांना सुविधा देण्याची गरज आहे. मात्र, त्यांच्यावर उपचाराच्या कोणत्याही सुविधा नसून या रुग्णांना सुविधा नसल्याचा आरोप माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. याबाबत त्यांनी संताप व्यक्त करीत आज थेट जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सुविधांबाबत जाब विचारला. 

याबाबत महाजन यांनी सांगितले, की जिल्ह्यात "कोरोना'च्या उपचाराबाबत काय चालले आहे, हेच कळत नाही. जिल्हा प्रशासन पूर्णपणे फेल गेले आहे. जामनेर येथील एक रुग्ण आज केवळ ऍम्बुलन्सअभावी दगावला. जिल्हा प्रशासन म्हणते आम्ही ऍम्बुलन्सची सुविधा केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात रुग्णांना घेऊन जाण्यासाठी एकही ऍम्बुलन्स उपलब्ध होत नाही. आज जामनेर येथे हीच परिस्थिती दिसून आली. ऍम्बुलन्स नसल्याने रुग्ण अगदी तडफडून मेला. जिल्हा प्रशासनाने ताबडतोब ऍम्बुलन्स ताब्यात घेऊन या सुविधा उपलब्ध कराव्यात. 

कोविडचे रुग्ण सायंकाळपर्यंत भुकेले 

"कोविड'च्या रुग्णांचे जेवणाचेही हाल असल्याची तक्रार त्यांनी केली, ते म्हणाले, जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात "कोविड' रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी त्यांना जेवणही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आज दुपारचे जेवण सायकांळी पाचपर्यंतही रुग्णांना मिळालेले नव्हते. रुग्ण सायंकाळपर्यंत भुकेले होते, ही कोणती सुविधा आहे.

या रुग्णांना जेवणासाठी रेड क्रॉस संस्थेला मक्ता देण्यात आला आहे. त्यांना एका रुग्णासाठी 180 रूपये जेवणाचे दिले जातात. तरीही रेडक्रॉस संस्था रुग्णांना वेळेवर जेवण देत नाही, शिवाय त्यांच्या जेवणाचा दर्जाही चांगला नसल्याच्या तक्रारी आहेत. सरकार जर 180 रूपये जेवणाचे देत असेल रेडक्रॉस सारख्या संस्थेने चांगले जेवण द्यावयास हवे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष द्यावे, असे आपण त्यांना सांगितले आहे, असे महाजन म्हणाले. मात्र, जिल्ह्यातील रुग्ण वाढण्यासाठी ही असुविधाच जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com