कोरोना टेस्ट निगेटिव्ह येताच गिरीश महाजनांची बंगालकडे कूच - Girish Mahajan marches to Bengal as soon as corona test comes negative | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

कोरोना टेस्ट निगेटिव्ह येताच गिरीश महाजनांची बंगालकडे कूच

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 31 मार्च 2021

भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या निवडणूक रिंगणात प्रचारासाठी उतरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सायंकाळी ते रवाना होणार आहेत. कोरोनाची लागण होण्यावरून माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली होती. 

लोकसभेला लयं जणांनी माझी मज्जा केलीय, त्याचे उट्टे काढण्यासाठीच मी आलोय!

दोघा नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, दोघांनी एकमेकांच्या कोरोना लागण बाबत राजकीय टीका करून संशय व्यक्त केला होता. ही लागण खोटी असल्याचे म्हटले होते. महाजन हे मुंबई येथे उपचार घेऊन मंगळवारीच जळगाव येथे आले. त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.

महाजन यांनी केली टेस्ट

गिरीश महाजन यांना पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात जायचे असल्याने त्यांनी मंगळवारी पुन्हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी केली असल्याचे सांगण्यात आले. आज त्याचा अहवाल आला असून ती निगेटिव्ह आली आहे. या अहवालामुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ते आज औरंगाबाद मार्गे विमानाने रवाना होणार आहेत. 

गृहमंत्र्यांनी १०० कोटी तुमच्यासमोर मागितले का? परमबीरसिंगांना न्यायालयाचा सवाल
 

महाजन यांना नुकताच जळगाव महापालिकेत झटका बसला होता. भाजपचे येथे बहुमत असताना शिवसेनेने महापौरपद मिळवले. भाजपचे अनेक नगरसेवक फुटले. त्यामुळे पहिल्यांदा महाजन यांना त्यांच्याच जिल्ह्यात पराभव चाखावा लागला. महापौरपदाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधीच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात राहावे लागले. तेथून आल्यानंतर ते थेट आता बंगालच्या मोहिमेवर निघाले आहेत.

पश्चिमं बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपच्या समोर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कडवे आव्हान आहे. त्यामुळे भाजपने देशभरातली नेत्यांना व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पाचारण केले आहे. त्यामध्ये महाजनही प्रचारला जाणार आहे. बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपचे सरकार स्थापन करायचे असा चंग केंद्रीय नेतृत्वाने बांधला आहे. त्यामुळे बॅनर्जी यांच्या प्रचार यंत्रणेला शह देण्यासाठी भाजपने देशभरातिल नेत्यांना प्रचारात उतरवले आहे.    

Edited By - Amol Jaybhaye   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख