गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण 

मागील काही दिवसांमध्ये देशात अनेक भागांत कोरोनाचा कहर वाढू लागला आहे.
 Girish Mahajan .jpg
Girish Mahajan .jpg

जळगाव : माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप होता त्यांनी कोरोनाची तपासणी केली, असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते जामनेर येथे गृहविलगीकरणात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी साधना महाजन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. साधना महाजन जामनेरच्या नगराधक्षा आहेत. आपला अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे महाजन यांनी कळवले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये देशात अनेक भागांत कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. पण महाराष्ट्रातील स्थिती सर्वाधिक चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. देशात सर्वात जास्त कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असलेल्या १९ जिल्ह्यांपैकी १५ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. तर मागील दहा दिवसांत सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील १९ जिल्ह्यांमध्ये मागील दहा दिवसांत सर्वाधिक वेगाने कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. यामध्ये पहिल्या सात स्थानावर महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. एकुण १९ जिल्ह्यात मध्य प्रदेशातील इंदौर, कर्नाटकातील बेंगलुरू शहर, तमिळनाडूतील चेन्नई तर पंजाबमधील जालंधर या शहरांचा समावेश आहे. उर्वरित १५ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. 

महाराष्ट्रात मागील १० दिवसांत पुणे, नागपुर, मुंबई या शहरांमध्ये दररोज जवळपास दीड हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यात दहा दिवसांत जवळपास २६ हजार रुग्ण आढळून आले. तर नागपुरमध्ये सुमारे २० हजार आणि मुंबीत ११ हजार रुग्ण समोर आले. या क्रमवारीत ठाणे, नाशिक, औरंगाबाद जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे ९ हजार, साडे सहा हजार रुग्ण आढळले. हे जिल्हे देशात पहिल्या सात क्रमांकावर आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com