ममतांना महाराष्ट्रातूनही आव्हान : गिरीश महाजन महिनाभर बंगालमध्ये मुक्काम ठोकणार

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे.
 Girish Mahajan .jpg
Girish Mahajan .jpg

जळगाव : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीत प्रचार यंत्रणा सांभाळणार आहेत.  बुधवारी (ता. ३१ मार्च ) पासून ते महिनाभर तेथे राहून प्रचार करणार, असल्याची माहिती महाजन यांनी दिली. 

भाजपच्या केंद्रातील तसेच तत्कालीन राज्यातील सरकारवर संकट आल्यानंतर गिरीश महाजन यांनी निवारण केले. शेतकरी, शेतमजूर मोर्चा, समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याबाबत मध्यस्थी करणे, आदी प्रसंगांची सोडवणूक करून पक्षाला संकटातून बाहेर काढले होते. त्यामुळे गिरीश महाजन केंद्रातील नेत्यांचेही विश्वासू आहेत. त्यामुळेच ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीत प्रचार करणार आहेत. पक्षाने ही निवडणुक जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. आता दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेतेही या प्रचारात सामील होत आहेत.

महाजन यांना नुकताच जळगाव महापालिकेत झटका बसला होता. भाजपचे येथे बहुमत असताना शिवसेनेने महापौरपद मिळवले. भाजपचे अनेक नगरसेवक फुटले. त्यामुळे पहिल्यांदा महाजन यांना त्यांच्याच जिल्ह्यात पराभव चाखावा लागला. महापौरपदाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधीच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात राहावे लागले. तेथून आल्यानंतर ते थेट आता बंगालच्या मोहिमेवर निघाले आहेत. 

पश्चिमं बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपच्या समोर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कडवे आव्हान आहे. त्यामुळे भाजपने देशभरातली नेत्यांना व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पाचारण केले आहे. त्यामध्ये महाजनही प्रचारला जाणार आहे. बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपचे सरकार स्थापन करायचे असा चंग केंद्रीय नेतृत्वाने बांधला आहे. त्यामुळे बॅनर्जी यांच्या प्रचार यंत्रणेला शह देण्यासाठी भाजपने देशभरातिल नेत्यांना प्रचारात उतरवले आहे.

पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांसाठी ८ टप्यात निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्यात ३० जागांसाठी २७ मार्चला मतदान झाले आहे. पुढील ७ टप्प्यांचे मतदान बाकी आहे. या निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे.

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com