खडसे म्हणाले, सीडी योग्य वेळी येईलच, पण... 

ईडीची चौकशी लावली, काय तथ्य आहे ते समोर येईल न्यायालय आहे.
 Ekhnath Khadse .jpg
Ekhnath Khadse .jpg

जळगाव : इडी लावली तर आपण सीडी लावणार असे बोललो होतो, त्यानुसार सीडीची चौकशी पोलिस करीत आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर लवकरच ती जाहीर करणार आहोत. असे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Ekhnath Khadse) यांनी जाहीर केले. (Ekhnath Khadse criticizes Chandrakant Patil)  

मुक्ताईनगर येथे खडसे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या मागे आपण ईडी लावल्याचे म्हटले, असल्याचे सांगून खडसे म्हणाले याकरीता आपण चंद्रकांतदादा यांचे आभारी आहोत. चंद्रकांतदादा यांनी सांगितले की आमच्याकडे भ्रष्टाचारी लोक आहेत. त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करतो. त्यामुळे मला अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या शेजारी बसलेल्या आजूबाजूच्या लोकांकडे बघावे आणि तो शब्द पूर्ण करावा. उभा महाराष्ट्र पाहतो आहे की शुद्ध चारित्र्याचे लोक पाटील यांच्या आजूबाजूला आहेत.

योग्य वेळी सीडी येईल

सीडीबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांनी ईडी लावली तर आपण सीडी लावू असे बोललो आहे, योग्य वेळी ती येईल. या सीडीची चौकशी पोलिसांकडून गेल्या चार पाच महिन्यांपासून सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यावर आपण ती जाहीर करणार आहोत.

आपल्या ईडीच्या चौकशीबाबत बोलताना खडसे म्हणाले, कर नाही त्याला डर कशाला या नुसार आपण त्याला सामोरे जात आहोत. न्यायालयात आपल्याला योग्य न्याय निश्चित मिळेल. गेली चाळीस वर्षे आपण राजकारणात आहोत. आपल्यावर एकही आक्षेप नव्हता. या जमिनीसंदर्भात हेतू पुरसर आक्षेप घेण्यात आला आहे. या व्यवहारात पूर्ण चौकशी झाली आहे. ती होवून त्याची सी समरी न्यायालयात गेली आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही असे एसीबी सांगितले आहे. तरीही ईडीची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभेत मी सांगितले की माझी काय चूक आहे. ते तरी सांगा. असेल तर आपल्याला फाशी द्या. मात्र, तरीही आपली ईडीची चौकशी लावली, काय तथ्य आहे ते समोर येईल न्यायालय आहे. त्या ठिकाणी योग्य तो निर्णय होईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com