१२ आमदारांचा मुद्दा; तर...रोहिणी खडसेंच्या नावावर होणार सहमती! 

आमदारांच्या या रखडलेल्या नियुक्तीचा मुद्दा उच्च न्यायालयापर्यंत गेला.
 Eknath Khadse, Rohini Khadse, .jpg
Eknath Khadse, Rohini Khadse, .jpg

जळगाव : राज्यपालांनी विधान परिषदेवर नामनिर्देशित करावयाच्या १२ आमदारांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचे (Raju Shetty) नाव वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) नावावरही आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. खडसेंऐवजी त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नावावर सहमती होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेवर राज्यपालांनी नामनिर्देशित करावयाच्या १२ जागा रिक्त असून, राज्य मंत्रिमंडळाने गेल्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये या १२ आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठविली. दहा महिन्यांनंतरही राज्यपालांनी या यादीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, अथवा ही यादी फेटाळलीही नाही. (Discussion of Rohini Khadse's name for the Legislative Council) 

आमदारांच्या या रखडलेल्या नियुक्तीचा मुद्दा उच्च न्यायालयापर्यंत गेला; परंतु न्यायालयालाही राज्यपालांच्या अधिकाराबाबत हस्तक्षेप करता येत नसल्याने यावरील सुनावणी पूर्ण होऊनही त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर सरकारतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात नुकतेच राज्यपालांना जाऊन भेटले त्यामुळे या विषयाला चालना मिळाली. 
 
शेट्टींचे नाव वगळले 

या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याचे सांगितले जात आहे. त्या बदल्यात दुसरे कोणते नाव दिले, याबाबत उत्सुकता आहे. तर एकनाथ खडसे यांच्या नावाला भाजपचा तीव्र आक्षेप असल्याने याबाबतही राष्ट्रवादी माघार घेण्याची शक्यता आहे. मात्र, खडसेंचे नाव अद्याप राष्ट्रवादीने वगळलेले नाही. त्यांच्या नावाला आक्षेप घेतला गेल्यास त्यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  
 
मुहूर्त टळल्याने चर्चा 

दरम्यान, गुरुवारी खडसेंचा वाढदिवस साजरा झाला. त्याच दिवशी राज्यपालांकडून या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होती. मात्र, तसे होऊ शकले नाही. राजू शेट्टींचे नाव वगळल्याचे वृत्तही याच दिवशी समोर आले. त्यामुळे खडसेंच्या नावावरील संभाव्य आक्षेप लक्षात घेता रोहिणी खडसेंचे नाव चर्चेत आले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com