जळगावातील नेत्यांचा चौकशीचा फेरा...जैन, देवकरानंतर आता खडसे, महाजन

राजकारण हे विकासासाठी असते असे म्हटले जाते. परंतु जळगाव जिल्ह्यातील राजकारणात विकास तर दूरच आहे
 Girish Mahajan, Suresh Jain, Eknath Khadse .jpg
Girish Mahajan, Suresh Jain, Eknath Khadse .jpg

जळगाव : राजकारण हे विकासासाठी असते असे म्हटले जाते. परंतु जळगाव जिल्ह्यातील राजकारणात विकास तर दूरच आहे. मात्र, चौकशीच्या फेऱ्यात पूर्ण राजकीय अस्वस्थता निर्माण झाली आहे. (The development of Jalgaon was hampered due to the inquiry of the leaders) 

जळगाव जिल्हा एकेकाळी विकासाच्या दृष्टीने अग्रेसर होता. परंतु याला दृष्ट लागली असेच म्हणावे लागेल, आज जळगाव जिल्ह्यात केवळ 'चौकशी' हेच शब्द राजकीय क्षेत्रात विकासावर मात करीत आहे. जळगाव जिल्ह्यातील नेत्यांचे राज्याच्या राजकारणात दबदबा होता, मात्र चौकशीच्या फेऱ्यात नेत्यांचे अस्तीत्व संपुष्टात आले. शिवसेना नेते व राज्याच्या राजकारणात वकूब असलेले सुरेसदादा जैन घरकुल प्रकरणात चौकशीत अडकले त्यांना शिक्षा झाली ते जामिनावर असले तरी राजकारणापासून आता अलिप्त आहेत. ते फारसे सक्रिय नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर हे सुध्दा घरकुल चौकशीत अडकले, त्यांना शिक्षा झाली, ते जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले, आमदारकी गेली, लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, आज त्यांना राजकीय अस्तित्वासाठी लढा द्यावा लागत आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणात महत्वाचे नेते होते, भारतीय जनता पक्षाला बळकट करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी त्यांच्या पाठीमागे ईडी चौकशीचा सासेमिरा लागला आहे.

भाजपचे नेते व आमदार गिरीश महाजन हे पक्षाचे संकटमोचक म्हटले जातात. मात्र, आता त्यांचे निकावर्तिय बी. एच. आर. पतसंस्था ठेवी  प्रकरणी अडचणीत आले आहेत. त्यांचे मित्र भाजपचे आमदार चंदू पटेल या प्रकरणात फरार आहेत. त्यामुळे महाजनही संकटात असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत जळगाव जिल्हा राजकीय दृष्टीने आज अस्वस्थ आहे. विकासावर सद्यस्थितीत कोणीही विचार करण्याच्या स्थितीत नाही.       

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com