Corona testing lab at Dhule closed | Sarkarnama

धुळ्यातील कोरोना टेस्टिंग लॅब 'व्हेंटलेटर' वर 

सरकारनामा ब्यूरो 
बुधवार, 1 जुलै 2020

 धुळे येथील प्रयोग शाळेतील कर्मचारी पॉझिटीव्ह आल्याने येथील लॅबचे काम बंद झाले आहे. यामुळे नंदुरबारमधील संशयित कोरोना बाधितांची तपासणी करण्याचे काम ठप्प झाले आहे. 

धुळे : धुळे येथील प्रयोग शाळेतील कर्मचारी पॉझिटीव्ह आल्याने येथील लॅबचे काम बंद झाले आहे. यामुळे नंदुरबारमधील संशयित कोरोना बाधितांची तपासणी करण्याचे काम ठप्प झाले आहे. 

धुळ्यातील कोरोना टेस्टिंग लॅबमधील कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यामुळे लॅबचे काम बंद झाले. त्यामुळे संशियतांचे पाझिटिव्ह, निगेटिव्ह अहवाल देण्याचे काम ठप्प झाले आहे. मंगळवारपासून (ता. 30 जून) रिपोर्ट देण्याचे काम बंद झाले आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील पन्नासहून अधिक संशयितांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे अहवालदेखील तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नाहीत.

नंदुरबार सामान्य रुग्णालयाककडून संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी तात्पुरत्या स्वरूपात पुणे अथवा अन्य ठिकाणी पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी धुळे येथे पाठवले जात आहेत. 

दरम्यान, टेस्टिंग लॅबमधील काम सुरू ठेवण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लॅबचे काम आजपासून (ता. 1 जुलै) सुरळीतपणे सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

राज्यात 91 हजार रुग्ण कोरोनामुक्त 

मुंबई : राज्यात   मंगळवारी (ता. 30 जून)  कोरोनाच्या 4878 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात 75 हजार 979 रुग्णांवर  उपचार सुरू आहेत. 

मंगळवारी (ता. 30 जून) 1951 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 90 हजार 911 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.2 टक्के एवढे कायम आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

मंगळवारी (ता. 30 जून) पाठविण्यात आलेल्या 9 लाख 66 हजार 723 नमुन्यांपैकी 1 लाख 74 हजार 761 नमुने पॉझिटिव्ह (18.7 टक्के) आले आहेत. 

राज्यात 5 लाख 78 हजार 33 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 38 हजार 866 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 
राज्यात आज 245 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी 95 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 150 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर 4.49 टक्के एवढा आहे. 

मागील 48 तासात झालेले 95 मृत्यू हे मुंबई मनपा-36, ठाणे-3, ठाणे मनपा-9, कल्याण-डोंबिवली मनपा- 4, भिवंडी निजामपूर मनपा-3, वसई-विरार मनपा-2, नाशिक-2, नाशिक मनपा-1, जळगाव-5, पुणे-1, पुणे मनपा-5, पिंपरी चिंचवड मनपा-3, सोलापूर मनपा-2, कोल्हापूर-1, रत्नागिरी-1, औरंगाबाद-2, औरंगाबाद मनपा-11, लातूर-1,अकोला-2, अकोला मनपा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे. 

मंगळवारी (ता. 30 जून) राज्यात एकूण नोंदविलेल्या 245 मृत्यूंपैकी 95 मृत्यू हे मागील 48तासातील आहेत आणि 150 मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील 57, ठाणे मनपा, 15, भिवंडी -42, कल्याण डोंबिवली-2, मीरा भाईंदर -4, ठाणे -3, पालघर -5, पनवेल -7, सोलापूर -6, औरंगाबाद -4, पुणे -3, नाशिक -1 आणि जळगाव -1 यांचा समावेश आहे. हे 150 मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतिपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख