ऑनलाईन सभा सुरू असताना भाजप नगरसेवकांनी थेट सभागृहात येऊन घातला गोंधळ : पहा व्हिडीअो

गाळे प्रश्नावर थेट सभागृहात येवून भाजप नगरसेवकांनी गोंधळ घातला त्यामुळे ऑनलाईन सभेचा फज्जा उडाला.
 Confusion in the general meeting of Jalgaon Municipal Corporation .jpg
Confusion in the general meeting of Jalgaon Municipal Corporation .jpg

जळगाव : जळगाव महापालिकेची (Municipal Corporation) आज ऑनलाईन महासभा आयोजित करण्यात आली आहे. गाळे प्रश्नावर थेट सभागृहात येवून भाजप नगरसेवकांनी गोंधळ घातला त्यामुळे ऑनलाईन सभेचा फज्जा उडाला. (Confusion in the general meeting of Jalgaon Municipal Corporation)

जळगाव महापालिकेत गेल्या महिन्यात सत्तांतर झाले, भाजपचे (BJP) सदस्य फोडून शिवसेनेने (Shiv Sena) सत्ता मिळवली. या नंतर आज पहिलीच ऑनलाईन महासभा आयोजित करण्यात आली होती. महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षेखाली ही सभा सुरू झाली. त्यावेळी गाळे धारकांच्या प्रस्नावावर भाजप सदस्य आक्रमक झाले, भाजप सदस्य कैलास सोनवणे, गटनेते भगत बालानी यांच्यासह काही सदस्य थेट सभगृहात आले व त्यांनी गोंधळ सुरू केला, त्यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी त्यांना बाहेर जाण्याच्या सूचना केल्या त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला. भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहात शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

दरम्यान, जळगाव महापालिकेत नुकतेच सत्तांतर झाले भारतीय जनता पक्षाचे (BJP) नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्ता मिळवली. यात शिवसेनेच्या जयश्री महाजन (Jayshree Mahajan) या महापौर झाल्या. महापालिकेत विरोधी पक्ष नेते पद शिवसेनेकडे होते. महाजन यांचे पती सुनील महाजन विरोधी पक्ष नेते होते ते आजही आहेत. त्यामुळे एकाच घरात महापालिकेतील महापौर आणि विरोधी पक्षनेता ही दोन्ही पदे आहेत. 

 जळगाव महापालिकेत २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७५ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला ५७ जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला १५ आणि एमआयएम पक्षाला तीन जागा मिळाल्या, त्यामुळे भाजप सत्ताधारी तर शिवसेना विरोधी पक्ष होता. अडीच वर्षांनी महिला राखीव असलेल्या महापौर पदासाठी निवडणूक लागली अन याच ठिकाणी मोठे उलटफेर झाले. भाजपचे तब्बल ३० नगरसेवक फुटले तर एमआयएमने ही शिवसेनेला पाठिंबा दिला आणि शिवसेनेकडे सत्ता आली.

शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांच्या पत्नी महापौर झाल्या. तर तांत्रिक बाबीत शिवसेनेकडे विरोधी पक्ष नेते पद आहे, त्यामुळे सुनील महाजन हेच विरोधी पक्ष नेते आहेत. सत्तांतर झाल्यानंतर जळगाव महापालिकेची पहिली महासभा ऑनलाईन आज होत आहे. पत्नी महापौर जयश्री महाजन व्यासपिठावर असतील तर पती सुनील महाजन विरोधी पक्षनेते आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com