मंत्रिपदासाठी राठोडांचे शक्तीप्रदर्शन अन् मुख्यमंत्री घेणार निर्णय  - Chief Minister Uddhav Thackeray will decide on my ministerial post | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मंत्रिपदासाठी राठोडांचे शक्तीप्रदर्शन अन् मुख्यमंत्री घेणार निर्णय 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 जुलै 2021

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचे नाव आल्याने मोठा गदारोळ उडाला होता.

जळगाव : माझ्या मंत्रिपदाबाबत विरोधकांनी कितीही विरोध केला तरी अंतीम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) घेतील, असे मत शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी जळगाव येथे बोलताना व्यक्त केले. (Chief Minister Uddhav Thackeray will decide on my ministerial post)  

आमदार राठोड सद्या खानदेश दौऱ्यावर आहेत. आज (ता. १९ जूलै) ते जळगाव येथे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राठोड म्हणाले, आपण आपल्या समाज्याच्या प्रश्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. तांड्यावर जावून समाज बांधावाशी चर्चा करीत आहोत. सद्या आपण खानदेश दौऱ्यावर आहोत.

हेही वाचा : नवज्योतसिंग सिद्धू जिंकले..बनले पंजाबचे कॅप्टन!

मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मला मंत्रिमंडळात घेण्या विषयीचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. ते निश्चित निर्णय घेतील. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ तुमच्या मंत्रिमंडळ समावेशाला विरोध केला आहे, असे विचारले असात राठोड म्हणाले, कोणी कसा विरोध केला यापेक्षा मुख्यमंत्री निर्णय घेतील.  

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तुम्हला क्लीन चीट दिली असल्याचे बोलले जात आहे, त्याविषयी बोलताना राठोड यांनी सांगितले की ''या बाबत आपण एकदा बोललो आहोत, या प्रकरणी पोलिस चौकशी सुरू आहे, योग्य वेळ येईल तेंव्हा आपण बोलणार आहोत, असे ते म्हणाले.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचे नाव आल्याने मोठा गदारोळ उडाला होता. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सरकारला लक्ष्य केले होते. विरोधकांकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती. यामुळे नाईलाजाने कोणत्याही चौकशीविना मुख्यमंत्री ठाकरेंना राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांच्या जबाबात राठोड यांना क्लिनचिट दिल्याने राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : स्वबळाची भाषा बोलणारे काँग्रेस नेते मोदी-पवार भेटीमुळे अचंबित! 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिस संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. भाजपने या प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पोलिसांनी अतिशय सावध भूमिका घेतली होती. या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. विशेषत: या प्रकरणाशी संबंधित कुठलीही माहिती बाहेर सांगू नये, अशी तंबीही पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख