मुंडण करून सरकारचे तेरावे घालणार : मंगेश चव्हाण

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केले, आम्हाला या शासनाने बारा दिवस कारागृहात ठेवले.
 Mangesh Chavan .jpg
Mangesh Chavan .jpg

जळगाव : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केले, आम्हाला या शासनाने बारा दिवस कारागृहात ठेवले. आम्ही याचा निषेध करतो. आज आपण मुंडण करून या सरकारचे तेरावे घालणार असल्याचा, इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील बारा हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करू नये. या मागणीसाठी आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी जळगाव येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले होते. त्यांनी अधिकाऱ्यास खुर्चीला बांधून ठेवले होते. या प्रकरणी त्यांच्यासह 11 शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 

मंगळवारी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. बारा दिवसानंतर त्यांची सुटका करण्यात आली. जळगाव कारागृहातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केले. आम्ही प्रतीकात्मक आंदोलन केले होते. आमचा कोणावरही वैयक्तिक रोष नव्हता. मात्र, या सरकारने आम्हाला बारा दिवस कारागृहात ठेवले. बुधवारी तेरावा दिवस आहे. आम्ही मुंडण करून सरकारचे तेरावे घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

दरम्यान, जळगाव वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीने अधिकारी शेख याना खुर्चीला बांधून व त्यांना बाहेर काढून कार्यालयास कुलूप ठोकले. चाळीसगाव तालुक्यातील तब्बल सात हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद केले होते.

शेतकरी बिल भरण्यास तयार असतानाही अधिकारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यास खुर्चीला बांधले. मात्र, जर शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर मंत्र्यांनाही खुर्चीला बांधण्यांचा इशारा चव्हाण यांनी दिला होता. या नंतर चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com