मंगेश चव्हाण यांनी मुंडण करून केले राज्यसरकारचे श्राद्ध - BJP MLA Mangesh Chavan criticizes the state government | Politics Marathi News - Sarkarnama

मंगेश चव्हाण यांनी मुंडण करून केले राज्यसरकारचे श्राद्ध

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

चव्हाण यांनी कारागृहातून सुटका झाल्यानंतर बुधवारी मुंडण करून राज्य सरकारचे श्राद्ध केले.

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कारागृहातून सुटका झाल्यानंतर बुधवारी मुंडण करून राज्य सरकारचे श्राद्ध केले.

शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर चाळीसगाव येथील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांसह जळगाव येथे आंदोलन केले होता. त्यांच्यासह 11  शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांना बारा दिवसानंतर सोडण्यात आले.

राज्य सरकारच्या प्रयत्नांना साथ द्या-शरद पवारांचे जनतेला आवाहन

शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी सरकारने आपल्याला बारा दिवस कारागृहात ठेवल्याच्या निषेधार्थ त्यांनी बुधवारी तेराव्या दिवशी सरकारचे श्राद्ध घातले. चाळीसगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कृषिपांथा येथे मुंडण करून सरकारचे श्राद्ध केले. या वेळी खुर्चीवर राज्यातील तिघाडी सरकारचा फोटो ठेवण्यात आला होता. या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. 

दरम्यान, जळगाव वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीने अधिकारी शेख याना खुर्चीला बांधून व त्यांना बाहेर काढून कार्यालयास कुलूप ठोकले. चाळीसगाव तालुक्यातील तब्बल सात हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद केले होते.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा खोटा...महाराष्ट्रच नव्हे तर भाजपची सत्ता असलेल्या राज्यांतही लस टंचाई
 

शेतकरी बिल भरण्यास तयार असतानाही अधिकारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यास खुर्चीला बांधले. मात्र, जर शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर मंत्र्यांनाही खुर्चीला बांधण्यांचा इशारा चव्हाण यांनी दिला होता. या नंतर चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख