. ..राजकीय दबाव, पैशाचे आमिष दाखवून भाजपचे नगरसेवक फोडले!

जळगाव महापालिका व मुक्ताई नगरपरिषदेचे नगरसेवक फोडून शिवसेनेत प्रवेश देण्यात येत आहे.
 Girish Mahajan .jpg
Girish Mahajan .jpg

जळगाव : राजकीय सत्तेचा दबाव, तसेच पैशाचे आमिष दाखवून भारतीय जनता पक्षाचे (BJP) जळगाव व मुक्ताईनगरचे नगरसेवक फोडण्यात आले, मात्र जनता त्यांना निश्चित धडा शिकवेल असा हल्ला भाजप नेते आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) केला आहे. (BJP leader Girish Mahajan criticized Shiv Sena)

जळगाव महापालिका व मुक्ताई नगरपरिषदेचे नगरसेवक फोडून शिवसेनेत प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपचे नगरसेवक फोडण्याच्या बाबतीत भाजप नेत्यांनी मौन बाळगले होते. मात्र, याबाबतीत गिरीश महाजन यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट मत व्यक्त केले. महाजन म्हणाले की, शिवसेना राज्यातील सत्तेच्या बळावर दबाव आणत आहे, तसेच नगरसेवकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे पक्षांतर करून घेत आहेत. 

भारतीय जनता पक्षात असल्यामुळे जनतेने या नगरसेवकांना निवडून दिले. आता मात्र ते पक्ष सोडून गेले आहेत, जनता आजही आमच्या सोबत असून आगामी काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. मुक्ताईनगर येथील नगरसेवक फुटले असल्याने त्यांना शिवसेनेने सत्तेच्या बळावर अपात्रतेची भीती दाखवली, तसेच काही नगरसेवकांना पैशाचे आमिष दाखवले, असा आरोपही महाजन यांनी केला.

 नगरसेवक अपात्र होतीलच

भारतीय जनता पक्ष सोडून गेलेले सर्व नगरसेवक पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरतील असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला, ते म्हणाले, भाजपने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, लवकरच त्याना नोटीस बजावली जाईल.

पक्ष मजबूत आहे

नगरसेवक फुटिमुळे जिल्ह्यात भाजप कमकुवत होत असल्याचे अमान्य करून महाजन म्हणाले, पक्षाला काहीही फरक पडला नाही पक्ष मजबूत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप निश्चित आपली ताकत दाखवून देईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com