पेपर बाजी करुन पक्षाला वेठीस धरू नका; अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी

जळगाव महानगर अध्यक्ष याना पदावरून दूर केल्यानंतर काही सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.
 Ajit Pawar .jpg
Ajit Pawar .jpg

जळगाव : पक्ष कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठा असतो, त्या मुळे पक्ष आदेश देईल तो मनलाच पाहिजे. उगाच राजीनामे देवून पेपर बाजी करून पक्षाला वेठीस धरू नका, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिली. (Ajit Pawar told NCP workers) 

जळगाव महानगर अध्यक्ष याना पदावरून दूर केल्यानंतर काही सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावर आरोप केले. गेल्या काही दिवसापासून हा वाद सुरू आहे. पवार यांनी या प्रकरणी कार्यकर्त्यांना चांगली तंबीच दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या भुसावळ विभागात विविध विकास कामांचा शुभारंभ ऑनलाईन पद्तीने अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, मी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत पक्ष कार्यालयात असतो. त्यावेळी मला समस्या सांगितल्या तर त्या सोडविता येतील. आता सद्या जळगावमध्ये पेपरबाजी जास्त चाललेली आहे. वास्तविक पक्षांतर्गत जे प्रश्न असतात त्यात पेपर बाजी करून काहीच साध्य होत नाही. माझी या कार्यक्रमा निमित्ताने सूचना आहे. विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परिवार आहे. घरातला पक्ष आहे, त्यामुळे राजीनामा देणे, पक्षाला वेठीस धरणे हा प्रकार करू नका. पक्ष हा कोणाकरिता थांबत नाही. पक्षापेक्षा कोणीही मोठा नसतो. आज अजित पवार उपमुख्यमंत्री असला तरी तो पक्षामुळेच आहे. याची जाणीव अजित पवार यांच्यासह सर्वांनी ठेवली पाहिजे. पक्षाच्या सूचना मान्य केल्या पाहिजेत. कोणीही ताम्रपट घेवून जन्माला आलेला नाही, असे पवार यांनी सांगितले. 

कुणीही आपण कायमच अध्यक्ष रहाणार असे समजू नये. ज्या एखादया व्यक्तीला जबाबदारी दिली असेल. त्या व्यक्तीने आपल्यला ही जबाबदारी कधीतरी सोडायची आहे. याची खूणगाठ मनाशी बांधूनच पुढे गेले पाहिजे. हे मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचे आहे. म्हणूनच मी सांगतो पक्षापेक्षा कुणीही मोठा नसतो. लोक येत असतात लोक जात असतात, पक्ष आपल्या आपल्या परीने पुढे जात असतो. पक्षाचे अनेक पाठीराखे असतात ते पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेऊन काम करीत असतात, असेही पवार यांनी सांगितले. 

आज शरद पवार साहेबांना राजकरणात येवून साठ वर्षे झाली आहेत. त्यांनी राजकारणात अनेक पिढ्या बघितल्या आज गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्या अवतीभोवती फिरत आहे. साहेब काय सांगतात काय सल्ला देतात, काय भूमिका घेतात याकडे लक्ष असते. लोकांना विस्वास आहे की पवारसाहेब महाराष्ट्राचे भलच करतील. महाराष्टात जातीच, पातीच, नात्याच, गोत्याच राजकरण पवारसाहेब करणार नाहीत. सर्वधर्म समभाव याच भूमिकेतून ते सर्वांना घेवून पुढे जातील याचा विस्वास आहे. ही गोष्ट तरुणांनी आणि वडीलधाऱ्यानी लक्षात घेतली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

Edited By - Amol Jaybhaye    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com