बीएचआर गैरव्यवहार; गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयासह 12 जणांना अटक

अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
BHR credit socitye .jpg
BHR credit socitye .jpg

जळगाव : राज्यभर गाजत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुरुवारी राज्यभरात ठिकठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे कार्यकर्ते आणि जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे यांच्यासह 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. (12 arrested in BHR credit socitye fraud case) 

अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही जण हे राजकीय व्यक्तींच्या जवळचे आहेत, त्यामुळे जळगावच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

जळगाव, औरंगाबाद, धुळे, अकोला, मुंबई, पुणे याठिकाणी हे छापे एकाचवेळी पडले आहेत. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या 15 टीमकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या बाबतची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

अटक केलेल्या संशयितांची नावे

भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे ( माजी सभापती, जामनेर पंचायत समिती), जितेंद्र रमेश पाटील (औरंगाबाद येथून अटक), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (रा. जळगाव, यांना पुण्यातील हॉटेलमधून अटक करण्यात आली) आणि प्रमोद किसनराव कापसे (अकोला) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

अटक सत्राचा दुसरा अंक

बीएचआर पतसंस्थेच्या गाजत असलेल्या घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक सत्राचा दुसरा दणका दिला आहे. आज (ता. १७ जून) पहाटेपासूनच या कारवाईला सुरुवात झाली. यापूर्वीही नोव्हेंबर 2020 मध्ये या प्रकरणात कारवाई झाली होती. तेव्हा 6 जणांना अटक झाली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता पुन्हा काही संशयितांची नावे समोर आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in