अहो आश्‍चर्यम... चार दिवसात `नमामि गोदा`चा डीपीआर तयार? 

गोदावरी नदीला पुनरुज्ज्वीत करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या नमामि गोदा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी दिल्या असल्या तरी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गेल्या वर्षाच्या डिसेंबरमध्येच कन्सल्टंट नियुक्त करण्याचा ठराव मंजूर केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
Satish Kulkarni
Satish Kulkarni

नाशिक : गोदावरी नदीला पुनरुज्ज्वीत करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या नमामि गोदा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी (centre government ask NMC tp submit namami goda project 2 days before)  दिल्या असल्या तरी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गेल्या वर्षाच्या डिसेंबरमध्येच कन्सल्टंट नियुक्त करण्याचा ठराव मंजूर केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. (BJP approve resolution of Appoint consultant in last december) परंतु, ठराव करताना केंद्र सरकारशी केलेल्या पत्रव्यवहाराचा उल्लेख असल्याने (They mention centre government reffrence) नमामि गोदा मुद्यावरून दोन दिवसांत कमावलेली पक्षाची इभ्रत वाचली. 

महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपच्या दृष्टीने गोदावरी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याला महत्त्व देण्यात आले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी दीड वर्षापासून प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रयत्न करताना नमामि गंगेच्या धर्तीवर ‘नमामि गोदा’ असे नामकरण केले.

होळकर पूल ते टाळकुटेश्‍वर मंदिर, तपोवन, टाकळी, दसक व पंचकपर्यंतच्या भागाचे सुशोभीकरण करून घाट विकसित करणे, गोदावरी प्रवाहित राहण्यासाठी गाळ काढणे, सर्व्हिस लेव्हल बेंच मार्क नियमानुसार शंभर टक्के सिव्हर नेटवर्क कव्हरेज साध्य करण्यासाठी मलवाहिकांचे जाळे विकसित करणे, नदीकाठच्या मुख्य मलवाहिन्यांची दुरुस्ती, क्षमतावाढ, मलनिस्सारण केंद्र बांधणे आदी कामांचा प्रकल्पात समावेश आहे. त्याचबरोबर गोदावरीच्या उपनद्या नंदिनी, वाघाडी, वालदेवी व कपिला या नद्यांच्या पात्रातील सांडपाणी रोखणे आदी कामांचा समावेश आहे. नमामि गोदा प्रकल्पासाठी मंगळवारी (ता. १०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन नमामि गोदा प्रकल्पाची माहिती देण्यात आली.

महापौर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील समिती दिल्लीतून नाशिकमध्ये पोचत नाही, तोच जलशक्ती मंत्रालयातर्फे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना येऊन धडकल्याने भाजपच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला. एवढ्या तत्काळ मिळालेल्या सेवेमुळे भाजपची प्रतिमा जनमानसात उंचावली गेली. परंतु, नमामि गोदा प्रकल्पासाठी मे. मंत्राज ग्रीन रिसोर्सेस लिमिटेडला कन्सल्टंट म्हणून नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी वास्तवात पालिकेतील सत्ताधारी भाजपने डिसेंबर २०२० मध्येच ठराव क्रमांक ४२८ द्वारे कन्सल्टन्सी नियुक्त करण्यास मान्यता दिल्याची बाब समोर आल्याने केंद्र सरकारकडून निधी मिळेल

या आधारे आठ महिने कन्सल्टन्ट नियुक्त केला का, कामासाठी आधी ठेकेदार निश्‍चित झाला, त्यानंतर प्रस्ताव तयार केला का, अशी शंका विरोधकांकडून निर्माण झाली. ठराव क्रमांक ४२८ मध्ये केंद्र सरकारला पाठविलेल्या प्रस्तावाचा उल्लेख असल्याने दोन दिवसांचा उत्साह मावळण्याची विरोधकांची आशा संपुष्टात आली. 

...
डिसेंबर २०२० मध्ये कन्सल्टन्सी नियुक्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता हे खरे आहे. केंद्र सरकारने तत्काळ प्रकल्प अहवाल मागितला असता, तर विलंब नको म्हणून ठराव करण्यात आला. परंतु आता कन्सल्टन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. 
- सतीश कुलकर्णी, महापौर 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com