`त्या` महिला सरपंचाने मंगळसूत्र गहान ठेवत गावाचे वीज बील भरले - Women mortgage gold ornaments for village Electriciy bill, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

`त्या` महिला सरपंचाने मंगळसूत्र गहान ठेवत गावाचे वीज बील भरले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

पुरुषांचे राजकारण म्हणजे स्पर्धा, `गावगुंडी`, पक्षीय गटबाजी आणि एकमेकांची कशी जिरवायची या भोवती फिरणारे त्यात अनेकदा गावाचे अन् चांगल्या महावस्त्राचे मातेरे झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. मात्र महिलांची गोष्टच न्यारी. त्या पदावर असल्या की गावासाठी कशाचा त्याग करतील याचा नेम नाही. असेच दभाषीच्या (ता. शिंदखेडा) सरपंच नंदिनी पाटील यांनी गावच्या पाणी योजनेचे वीजेचे बील भरण्यासाठी आपले मंगळसूत्र गहान टाकून गावची तहान भागवली.

धुळे : पुरुषांचे राजकारण म्हणजे स्पर्धा, `गावगुंडी`, पक्षीय गटबाजी आणि एकमेकांची कशी जिरवायची या भोवती फिरणारे त्यात (Gents political rivary is always Hurdle Devolopment) अनेकदा गावाचे अन् चांगल्या महावस्त्राचे मातेरे झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. मात्र महिलांची गोष्टच न्यारी. (womens are always positive in Politics) त्या पदावर असल्या की गावासाठी कशाचा त्याग करतील याचा नेम नाही. असेच दभाषीच्या (ता. शिंदखेडा) सरपंच नंदिनी पाटील (Sarpanch Nandini Patil) यांनी गावच्या पाणी योजनेचे वीजेचे बील भरण्यासाठी आपले मंगळसूत्र गहान टाकून गावची तहान भागवली.

राजकारणात येऊ पहात असलेला `आऊट ऑफ बॅाक्स` पॅटर्न म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. तहानेने व्याकुळ गावासाठी नव्याने उभारलेल्या जलशुध्दीकरण केंद्रासाठी वीज जोडणी घेण्यात आली. याबाबत विरोधकांनी तक्रार केली. चौकशीअंती महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीला ८४ हजाराचा दंड ठोठावला आणि वीजपुरवठा खंडीत केला. या स्थितीत गावाची तहान भागविण्यासाठी लोकनियुक्त सरपंच नंदिनी विकास पाटील सरसावल्या. त्यांनी मंगळसूत्रासह इतर दागदागिने गहाण ठेवत कंपनीला पैसे दिले आणि वीजपुरवठा सुरळीत करून घेतला. ही एखाद्या सिनेमाची पटकथा नसून दभाषी (ता. शिंदखेडा) येथील वास्तव स्थिती आहे.

शिंदखेडा तालुका अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील दोन गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. या तालुक्यातीलच दभाषी येथील लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत दोन वर्षापूर्वी नंदिनी पाटील विजयी झाल्या. गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी तत्कालीन मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या सहकार्याने पाणी योजना मंजूर करून घेतली. तसेच ग्रामस्थांच्या आरोग्यहितासाठी जलशुध्दीकरणही उभारले. परंतु, लालफितीच्या कारभारामुळे या केंद्राच्या चाचणीसाठी वीजपुरवठा उपलब्ध होत नव्हता.

सरपंच पाटील सरसावल्या
ग्रामस्थांनी गावाची तहान भागावी म्हणून वीजपुरवठा उपलब्ध करुन घेतला. याबाबत कुणीतरी तक्रार केली. त्यामुळे वीज कंपनीने चौकशी करत दभाषी ग्रामपंचायतीला ८४ हजारांचा दंड ठोठावला आणि जलशुध्दीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत केला. गाव तहानेने व्याकुळ झाले. अशा संकटात पाणी योजनेसाठी वीजपुरवठा सुरळीत करुन घेणे कमप्राप्त झाले. त्यासाठी सरसावलेल्या सरपंच नंदिनी पाटील यांनी कुटुंबियांशी चर्चा केली आणि मंगळसूत्र, इतर दागदागिणे सराफाकडे गहाण ठेवले. त्यातून मिळालेले पैसे कंपनीला देत वीजपुरवठा सुरळीत करुन घेतला. त्यामुळे उन्हाळ्यात दभाषीमधील ग्रामस्थांची तहान भागू शकली. गावासाठी मंगळसूत्र, सोने गहाण ठेऊन पिण्याच्या पाण्याची सोय केल्याबद्दल ग्रामस्थांनी सरपंच नंदिनी पाटील यांचे कौतुक केले.

...
विरोधकांनी केवळ द्वेषापोटी तक्रार केली. ते गाव विकासाच्या कामांमध्ये बाधा आणण्याचे काम करीत असतात. परंतु, त्यामुळे गावाचेच नुकसान होत असते. आठ दिवसांनी मिळणारे पाणी रोज देण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु, तक्रारीमुळे नियमित होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता. ग्रामस्थ त्रस्त झाले. त्यांचे हाल बघविले गेले नाही. त्यामुळे मंगळसूत्र, दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला.
- नंदिनी विकास पाटील, सरपंच, दभाषी (ता. शिंदखेडा)

...
दभाषीच्या पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडीत झाला. वीज कंपनीचे देणे महत्वाचे होते. परंतु, कोरोना संसर्गामुळे ग्रामस्थांनी आगळा वेगळा दुष्काळ अनुभवला. त्यातच खरिप हंगामाची तयारी करायची. त्यामुळे ग्रामस्थांची आर्थिक ओढाताण झाली. इच्छाशक्ती असूनही ग्रामस्थ पैसे जमा करु शकत नाही. परंतु, सरपंच नंदिनी पाटील यांनी स्वत:चे सोने आणि मंगळसूत्र गहाण ठेवत गावाची तहान भागविली. त्यांचे धाडस निश्चितच कौतुकास पात्र आहे.
- आबा पाटील, ग्रामस्थ, दभाषी (ता. शिंदखेडा)
...
हेही वाचा...

भाजपचा शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांना `दे धक्का`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख