भाजप आमदार दिलीप बोरसेंना ग्रामस्थांनी कोंडले - Villagers locked BJP MLaA Dilip Borse in kersane village. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

भाजप आमदार दिलीप बोरसेंना ग्रामस्थांनी कोंडले

रोशन भामरे
बुधवार, 24 मार्च 2021

मतदारसंघात गारपीटीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज सकाळी आमदार दिलीप बोरसे हे केरसाने (ता. बागलाण) येथे गेले होते. यावेळी वीज प्रवाह खंडीत केल्याने संतप्त ग्रामस्थांनी त्यांना ग्रामपंचायतीच्या खोलीत कोंडले. त्यामुळे खळबळ उडाली. वीज प्रवाह सुरु झाल्यावर सुमारे दिड तासाने आमदारांना मोकळे केले. 

नाशिक : बागलाण मतदारसंघात गारपीटीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज सकाळी आमदार दिलीप बोरसे हे केरसाने (ता. बागलाण) येथे गेले होते. यावेळी वीज प्रवाह खंडीत केल्याने संतप्त ग्रामस्थांनी त्यांना ग्रामपंचायतीच्या खोलीत कोंडले. त्यामुळे खळबळ उडाली. वीज प्रवाह सुरु झाल्यावर सुमारे दिड तासाने आमदारांना मोकळे केले. 

दरम्यान यानंतर आमदार बोरसे यांनी या गावातील सर्व ग्रामस्थ आमचेच आहेत. त्यांच्याविषयी माझी काहीही तक्रार नाही. गावात पाहणीसाठी आलो होतो. तेव्हा येथील अडचणी पाहून मी स्वतः समस्येचे निराकरण होईपर्यंत गाव सोडायचे नाही असे ठरवले होते. त्यानुसार ग्रामस्थांचे समाधान झाले आहे, असा दावा केला.  

आज सकाळी केरसाने गावात वीजचे रोहित्र व वीजेच्या जोडण्या खंडीत करण्यात आल्या होत्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बागलाणचे आमदार बोरसे यांना भेटल्यावर ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यांना ग्रामस्थांनी केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोंडल्याचा प्रकार घडला. 

या भागात दोन दिवसांनी तुफान गारपीट झाली होती. एकीकडे अवकाळी पाऊस व गारपीटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन दोन दिवसांपासून खंडित होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले.  जोपर्यंत शेतीसाठी वीज कनेक्शन जोडले जात नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पडू देणार नाही अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी आमदार बोरसे यांना सांगितले. या ग्रामस्थांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या मांडला होता. यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या आडमुठ्या धोरणाचा  निषेध केला.

दरम्यान, बंद असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयातूनच आमदारांनी प्रारंभी ग्रामस्थांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ समजुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर आमदार बोरसे यांनी महावितरण संपर्क करीत महावितरणला तात्काळ विजजोडणी करा अशी विनंती केली. महावितरणचे अधिकारी गावात आले. त्यानंतर विजजोडणी केल्यानंतर ग्रामस्थांनी आमदारबोरसे यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर सोडले. 

गेल्या दोन दिवसांत या भागात मोठी गारपीट झाली. सिंचनाला, शेतीला पाणी नाही. मोठे संकट आहे. अशा स्थितीत जगण्याचे मोठे संकट आहे. वीजेचे बील कसे भरणार असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी केला.

...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख