अंबड, सिन्नरच्या ट्रक टर्मिनलसाठी उद्धव ठाकरेंना साकडे

अंबड व सिन्नर औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनलसाठी राखीव भुंखड विकसित करण्यात यावेत, अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
Truck terminus
Truck terminus

नाशिक : अंबड व सिन्नर औद्योगिक वसाहतीतील  ट्रक टर्मिनलसाठी राखीव भुंखड विकसित करण्यात यावेत, (Plot reserve for Truck terminal shall develop) अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (Deemend by Nashik district transport association) वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre)यांच्याकडे करण्यात आली आहे. 

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिका हद्दीमधील सातपूर,अंबड तसेच सिन्नर येथे माळेगाव परिसरात एमआयडीसी असून याठिकाणी मोठ्याप्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात मोठयाप्रमाणात अवजड वाहतूक होते. नाशिक शहर भारताचे स्मार्ट सिटीचे यादीत समाविष्ट झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये मोठी गुंतवणूक होऊन शहराचे औद्योगिकीकरणात मोठी भर पडणार आहे. शहरात असलेल्या मोठया औद्योगिक वसाहतीमुळे तसेच शेतमालाचे वाहतुकीसाठी भारतातील अनेक राज्यांमधुन माल वाहतुकीसाठी अवजड वाहने (ट्रक व ट्रेलर) येत असतात. सदर ट्रक,ट्रेलर हे रस्त्यात उभे राहतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो आणि यामुळे अनेक अपघात झालेले आहे यात अनेक कामगारांना आपले जीव गमवावे लागले आहे.ही बाब लक्षात घेऊन आपण आरक्षित ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे असे म्हटले आहे.

अंबड येथे औद्योगिक वसाहतीत मंजुर विकास आराखडयात ट्रक टर्मिनलसाठी ५ एकर व सिन्नर येथे ४ एकर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे.या जागा कायदेशीर आरक्षित असून याचे आरक्षण न बदलता सर्व सोयी सुविधांसाठी पुरेशी आहे. सदर ठिकाणी ट्रक टर्मिनल विकसित होणेबाबत संघटनेच्यावतीने यापुर्वी वारंवारपाठपुरावा करण्यात आलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत याठिकाणी ट्रकटर्मिनल उभारण्यासाठी कोणतेही सकारात्मक निर्णय झालेले नाही. यापुर्वी देखील संस्थेच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु दुर्दैवाने सदरबाबत आजपावेतो कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. सदर विषय गेले अनेक वर्ष प्रलबिंत आहे. ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित जागेत ट्रक टर्मिनलच उभे रहावे ही संघटनेची व उद्योजकांची मागणी असून त्याचा लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

शहराचे वाढते औद्योगिक वितरणामुळे व एकुणच चौफेर विकसित होणाऱ्या शहरात विशेषत: औद्योगिक परीसरात ट्रक टर्मिनल असणे हे अत्यंत आवश्यक बाब आहे. ट्रकवरील चालक व क्लीनर हे बाहेर राज्यातील व अत्यंत गरीब परीस्थितीतील असुन ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी त्यांचे राहण्याची, उपहारगृह, स्वच्छागृह, विश्रांतीगृह, वाहन दुरूस्तीसाठी गँरेज, डीझेल पंप, वजन काटा, स्पेअर पार्ट दुकान, गोडावून, सर्विस स्टेशन, प्रशिक्षण हॉल, प्रथमोपचारसाठी व्यवस्था असावी. अशी आमची अनेक वर्षापासुनची मागणी प्रलबिंत आहे.  नाशिक शहरातील तसेच सिन्नर आरक्षित ट्रक टर्मिनल विकसित झाल्यास शहरावरील वाहतुकीचा ताण तसेच वाहतुककोंडी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या सर्व परीस्थितीचा व वस्तुस्थितीचा विचार करता, अंबड एमआयडीसी तसेच सिन्नर एमआयडीसीमधील ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित भुखंड कायद्याचे उल्लंघन न करता आरक्षण न बदलता विकसित करण्यात येऊन याठिकाणी ट्रक टर्मिनल उभारण्यात यावे.

याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना निवेदन दिले आहे. 

निवेदनाच्या प्रती खासदार हेमंत गोडसे, आमदार सिमाताई हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, आमदार सरोज आहेर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव,  एमआयडीसीचे मुख्य आयुक्त व प्रधान सचिवांना पाठविण्यात आल्या आहेत. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com