वाघाशी मैत्री होत नसते, कोणाशी मैत्री करावी हे वाघ ठरवतो

एका दिल्लीच्या दौऱ्याने सगळ्यांना चर्चेला विषय मिळाला. मैत्रीच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र वाघाशी मैत्री होत नसते. वाघ स्वतः ठरवतो कोणाशी मैत्री करायची ते. आम्हाला विधानसभेत शंभारहून अधिक आमदार हवे आहेत. त्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
Sanjay Raut
Sanjay Raut

नाशिक :  एका दिल्लीच्या दौऱ्याने सगळ्यांना चर्चेला विषय मिळाला. (CM Uddhav Thakre Delhi tour became Issue) मैत्रीच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र वाघाशी मैत्री होत नसते. वाघ स्वतः ठरवतो कोणाशी मैत्री करायची (Tiger decides his freinds) ते. आम्हाला विधानसभेत शंभारहून अधिक आमदार हवे आहेत. त्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena leader Sanjay Raut) यांनी सांगितले. 

खासदार राऊत कालपासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यासंदर्भात आज ते पत्रकाराशी बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक राजकीय पक्षाचे संघटनात्मक दौरे होत असतात. त्यानुसार माझे दौरे सुरु आहेत. कोरोनाच्या काळात फारसे संपर्क दौरे करता आले नव्हते. त्यामुळे आता बाहेर पडलो आहे. मागच्या आठवड्यात मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आहे. कालपासून नाशिकचा दौरा सुरु केला आहे.  सगळेच नेते दौरे करतात. त्यामुळे वेगळे काही नाही. 

ते म्हणाले, आमच्यासाठी शिवसेनेची संघटना महत्त्वाची आहे, सत्ता नाही. आगामी काळात अनेक ठिकाणी महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आम्ही सक्रीय होत आहोत. आम्हालाही वाटते की विधानसभेत आमच्या आमदारांची संख्या शंभरच्या पुढे जावी. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीतील घटक पक्ष आपआपल्या पक्षांचं काम करत आहेत.

खासदार राऊत म्हणाले, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान भेटीबाबत केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. ते म्हणाले, एका दौऱ्याने फारसा किंवा लगेच चर्चा करण्याची गरज नाही. कारण एका दौऱ्याने लगेच मैत्रीची चर्चा होऊ नये. कारण शिवसेना वाघ आहे. वाघाशी मैत्री होत नसते. वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची. त्यामुळे चंद्रकांत दादांनी यादी कोणाशी मैत्री करावी याची यादी पाठवावी. आम्ही ठरवू कोणाशी मैत्री करायची. 

पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करू नये
नवी दिल्लीतील बैठकीबाबत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपाचे नेते आहेत. ते देशाचेही मोठे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत प्राप्त झालेल यश मोदींमुळेच मिळाले आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटा लावला जात होता. सगळे भाजपचे लोक तो फोटो वापरायचे. तोच त्यांचाचेहराल होता. मात्र नेत्याचा चेहरा वापरायचा की नाही, हे नेते नाही तर कार्यकर्ते ठरवतात. पंतप्रधान प्रचाराला जातात. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान म्हणून जाऊ नये, अशी आमची भूमिका होती. पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करू नये अशी देखील आमची भूमिका आहे. मोदी हे देशाचे देशाचे पंतप्रधान आहेत, याची जाण त्यांनी ठेवावी.

उद्धव ठाकरे रस्त्यावर होते
पावसामुळे मुंबई शहरात मालाड येथील इमारत कोसळली. ही दुर्घटना दुर्दैवी आहे. मोडकळीस आलेल्या इमारती आणि प्रचंड पाऊस यामुळे ही दुर्घटना घडली. मुंबईत जो पाऊस झाला तेव्हा सगळे शिवसेना कार्यकर्ते लोकप्रतिनिधी रस्त्यावर जाऊन लोकांमध्ये मदतकार्य करत होते. टीका करणाऱ्यांचे काय जाते. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांसह सगळे पदाधिकारी काल रसत्यावर होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com