महाविकास आघाडीचे सरकार जनहितासाठी जागरूक!

महाविकास आघाडीचे सरकार जागरूक आहे. सरकारचे निर्नेय तळागाळातील लोकांचे त्यात हित पहिले जाते. मात्र केंद्र अदानी-अंबानी यांच्या पुढे लोटांगण घालतांना दिसते. शेतकऱ्यांचे हित दिसत नाही.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : महाविकास आघाडीचे सरकार जागरूक आहे. सरकारचे निर्नेय तळागाळातील लोकांचे त्यात हित पहिले जाते. मात्र केंद्र अदानी-अंबानी यांच्या पुढे लोटांगण घालतांना दिसते. शेतकऱ्यांचे हित दिसत नाही. टाटा-बिर्ला सारख्या उद्योगपतीनी कायम देशाला गरज पडेल तेंव्हा मदत करत दातृत्व निभावले त्यांना मात्र त्रास देण्याचे काम होत आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

मोडाळे ( ता. इगतपुरी ) येथील विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, राज्यात सरकार स्थापन झाले आणि लॉक डाऊन सुरु झाले मात्र मागच्या वर्षाची विकासाची कसर भरून काढू. मतदार विकास करतांना जात-पात पाहत नाही, जो विकास करेल त्याच्या पाठीमाघे भक्कमपणे उभी राहते. त्याच्या कारकिर्दीला पुढे त्याला भीती नाही. विकास कामे करतांना पाठपुरावा महत्त्वाचा असतो. तो आमदार खोसकर यांच्या सारखा असावा. खोसकर यांनी शेतकऱ्यांना 628 हेक्टर जमीन मिळवून दिली. काम करा जनता तुम्हाला डोक्यावरून खाली कधीच खेचणार विरोधकांची ती ताकद देखील नाही.  

यावेळी आमदार खोसकर म्हणाले की, येथील शेतकरी तहानलेला आहे. धरण उशाला अन कोरड घशाला अशी गत आहे. रद्द केलेल्या पाणी परवानग्या सुरु कराव्यात. वळण बंधारे त्यावर चांगला उपाय असून त्यावर पाठपुरावा सुरु आहे. सहकार्य करा विकास होणार आहे. वंचित शेतकरी,बेरोजगार युवक व येथील व्यवसायांना निश्चित सुगीचे दिवस आण्यासाठी कटीबद्ध आहे. 

यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. संदीप गुळवे, माजी आमदार जयंत जाधव, शिवराम झोले, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोडे, शिक्षण सभापती सुरेखा दराडे, समाजकल्याण सभापती सुशीला मेंगाळ, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, ज्ञानेश्वर लहाने, शिवसेना तालुकाध्यक्ष भगवान आडोळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, जनार्दन माळी आदि उपस्थित होते.
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com