एसपी पंडित यांनी शब्द पाळला; दोन तासांत आरोपी अटक! 

दराणे (ता. शिंदखेडा) येथील तरुणाच्या खून प्रकरणी आरोपीला नरकातून शोधून काढेन, अन्यथा नोकरी सोडेन, असा शब्द देत संतप्त जमावाला शांत करणारे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शब्द पाळला.
Chinmay Pandit
Chinmay Pandit

धुळे : दराणे (ता. शिंदखेडा) येथील तरुणाच्या खून (Darane`s youth musdered) प्रकरणी आरोपीला नरकातून शोधून काढेन, (We will search accused even from hell otherwise risigne) अन्यथा नोकरी सोडेन, असा शब्द (He keep his word) देत संतप्त जमावाला शांत करणारे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित (Chinmay Pandit) यांनी शब्द पाळला. त्यांच्या यंत्रणेने दोन तासांत आरोपींना हुडकून काढले. 

शिंदखेडा न्यायालयाने मंगळवारी आरोपींची पाच दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली. या वेळी संतप्त जमावाने आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. 

दराणे येथील पशुचिकित्सक प्रेमसिंह राजेंद्र गिरासे (वय २१) हा एकुलता व घरातील कर्ता होता. त्याच्या शेतकरी वडिलांचे मंगळवारी मणक्याचे ऑपरेशन होते. तो मित्रांसह सोमवारी (ता. ६) पाटण येथे बजाज शोरूमला गेला होता. त्याने २५ हजार रुपये डाउन पेमेंट भरून नवीन बजाज प्लॅटिना दुचाकी खरेदी केली. तेथून तो एकटा ही दुचाकी घेऊन घराकडे म्हणजेच दराणेकडे निघाला. त्या वेळी सोनगीर-दोंडाईचा रोडवरील चिमठाणे वीज उपकेंद्राजवळ दुपारी सव्वातीनला प्रेमसिंहला अनोळखी तीन तरुणांनी अडविले. त्याच्यावर धारदार शस्त्राने गळा व छातीवर वार करत जागीच ठार केले. नंतर नवीन दुचाकी व प्रेमसिंहचा मोबाईल घेऊन तिघे आरोपी पळून गेले. 

संतप्त जमावाचा रास्ता रोको 
ही घटना वाऱ्यासारखी शिंदखेडा तालुक्यासह जिल्ह्यात पसरल्यावर दराणे-रोहाणेसह ठिकठिकाणचे संतप्त ग्रामस्थ, नातेवाइकांनी दराणे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यात शेकडो आंदोलक सहभागी झाले. सोमवारी (ता. ६) रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिंदखेड्याचे निरीक्षक सुनील भाबड व फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिस अधीक्षक पंडित यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलक परतले. 

रात्रीतूनच लावला खुनाचा छडा 
या पार्श्वभूमीवर श्री. पंडित यांनी रात्रीतूनच एलसीबीची तीन, तर शिंदखेडा पोलिसांची तीन, अशी सहा शोध पथके कामाला लावली. मार्गावरील पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे प्रेमसिंहचा खून खलाणे (ता. शिंदखेडा) येथील श्‍याम युवराज मोरे (वय २८), राकेश रोहिदास मोरे (३२), संदीप फुलचंद पवार (२१) यांनी केल्याची एलसीबीच्या पथकाला खात्री झाली. 

प्रथम पोलिस पथक खलाणे येथे श्‍याम मोरेच्या घरी गेले. तो पत्नीसह तालुक्यातील माळीच येथे सासुरवाडीला गेल्याचे कळाले. तेथेही पोलिस धडकले. तेव्हा आरोपी श्‍याम व राकेश दुचाकीने शिरपूरकडे गेल्याची माहिती मिळाली. त्यांना पाठलाग करत पोलिसांनी गव्हाणे शिवारातील पेट्रोलपंपाजवळ त्यांना ताब्यात घेतले. दोघा आरोपींनी संदीपच्या मदतीने नवीन दुचाकी चोरीसाठी प्रेमसिंहचा खून केल्याची कबुली दिली. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना शिंदखेडा पोलिसांच्या ताब्यात दिले. शिंदखेड्याचे न्यायाधीश संतोष वैद्य यांनी तिघा आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी केली. 

आरोपी श्‍याम व राकेशवर सुरतमध्ये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. श्री. बुधवंत, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी व कर्मचारी पथकाने रात्रीतून दोन तासांत तीन आरोपींना जेरबंद केले. याकामी शिंदखेड्याचे निरीक्षक सुनील भाबड, नरडाण्याचे निरीक्षक मनोज ठाकरे, चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक कैलास दामोदर, हवालदार रफिक मुल्ला, हवालदार एकलाक पठाण, चव्हाण व गांगुर्डे यांचे सहकार्य लाभले. 

संतप्त जमावाच्या पुन्हा घोषणा 
तीन आरोपींना शिंदखेडा पोलिस ठाण्यातून मंगळवारी न्यायालयात नेताना दराणे-रोहाणे येथील संतप्त शेकडो तरुणांसह ग्रामस्थांनी, राजपूत करणी सेनेने जोरदार घोषणाबाजी केली. आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी त्यांनी केली. पोलिस निरीक्षक भाबड यांना निवेदन देत खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. शिरपूरचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, नरडाण्याचे निरीक्षक मनोज ठाकरे यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त शिंदखेडा न्यायालय परिसरात होता. तसेच शिंदखेडा शहरात मोठ्या प्रमाणात पोलिसांसह दंगल नियंत्रक पथक तैनात होते. 

...अन्‌ जमावाला एसपींचा शब्द 
प्रेमसिंह गिरासेचा खून झाल्यानंतर दराणे फाट्यावर रात्री शेकडो संतप्त ग्रामस्थ आंदोलन करत असताना त्यांची समजूत काढण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पोलिस वाहनातील ध्वनिक्षेपकाचा माइक हातात घेतला. ते भावनिक आवाहन करताना म्हणाले, की दीड वर्षापासून जिल्ह्याचा कारभार सांभाळताना प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावत आहे. दराणे येथील जो भाऊ गेला आहे, त्याचे मलाही दुःख आहे. माझ्या घरातील कुणी सदस्य गेल्यावर जितके दुःख होते तितकेच मला झाले आहे. भररस्त्यावर असा कोणी गुन्हा करत असेल तर त्याला जरब बसविली जाईल. या घटनेतील आरोपी नरकात जरी असले तरी त्यांना शोधून काढेन, असा शब्द देतो, अन्यथा नोकरी सोडेन. यानंतर जमाव शांत झाला आणि श्री. पंडित यांच्या भूमिकेला टाळ्यांचा प्रतिसाद देत माघारी परतला. 

जमावाकडून आरोपींचे घर लक्ष्य 
संतप्त जमावाने या घटनेतील खलाणे येथील आरोपींचे घर लक्ष्य केले होते. ते पेटवून देण्याचा प्रयत्न होता, अशी चर्चा लपून राहिली नाही. आरोपींच्या घराजवळ मंगळवारी संतप्त नातेवाइकांनीही मोठी गर्दी केली होती. मात्र, ही खदखद पोलिसांच्या कानी पडल्याने सोमवारी रात्रीपासून पोलिसांचा फौजफाटा व राज्य राखीव दलाचा कडक बंदोबस्त खलाणेत व आरोपींच्या घराजवळ असल्याने पुढील अनर्थ टळल्याचे समजते. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com