धक्कादायक...नाशिकमध्ये चार महिन्यात नऊ हजार मृत्यु!

गेले सहा महिने नाशिककरांना कोरोना संसर्गाने हैराण केले होते. देशातील सर्वाधीक कोरोनाग्रस्त रुग्ण या शहरात होते. त्यातून झालेल्या मृत्युची संख्या धक्कादायक आहे. महापालिकेने राज्य शासनाला पाठविलेल्या अहवालात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत शहरात तब्बल नऊ हजार ११२ मृत्यु झाले आहेत.
Kailas Jadhav
Kailas Jadhav

नाशिक : गेले सहा महिने नाशिककरांना कोरोना संसर्गाने हैराण केले होते. (Covid19 disturb city people) देशातील सर्वाधीक कोरोनाग्रस्त रुग्ण या शहरात (Highest corona patients in the country at Nashik) होते. त्यातून झालेल्या मृत्युची संख्या धक्कादायक आहे. महापालिकेने राज्य शासनाला पाठविलेल्या अहवालात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत शहरात तब्बल नऊ हजार ११२ मृत्यु ((9k people died) झाले आहेत. 

या अहवालानुसार मृत्युत ५,५५८ पुरुष तर ३,५५४ महिला आहेत. मृतांचा आकडा अधिक आहे. त्यामुळे नागिरकांत रोष निर्माण होण्याची भिती आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाने मृत झालेल्या नागरिकांची अधिकृत संख्या अद्याप जाहीर केलेली नाही. 

गेल्या वर्षी कोरोनाने शहरात हाहाकार उडविला होता. डिसेंबर २०२० अखेर पर्यंत ही पहिली लाट ओसरली. जानेवारी २०२१ मध्ये कोरोना संसर्गाची शहर कोरोना संकटातून बाहेर पडले. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अधिक तीव्रता धारण केली. त्यात विक्रमी रुग्ण संख्या नोंदविली गेली. रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे मृतांची संख्या देखील वाढली. मात्र किती रुग्ण कोरोनामुळे दगावले यासंदर्भातील आकडेवारी अद्यापही बाहेर आलेली नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाला पाठविलेल्या आकडेवारीमध्ये एकुण मृतांचा आकडा प्राप्त झाले आहे. त्यात जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधी मध्ये नऊ हजार ११२ मृत्यु झाले. चार महिन्यातील आकडेवारीचा विचार करता त्यात सर्वाधिक कोरोना संसर्गाने रुग्ण मृत झाले असावेत असा अंदाज आहे. 

एप्रिलमध्ये सर्वाधिक मृत्यु
एप्रिल २०२१ हा महिना नाशिक शहरासाठी सर्वाधिक जिवघेणा ठरला. या महिन्यात २८७१ पुरुष व २०४४ महिला असे ४९१५ मृत्यु झाले. चार महिन्यातील एकुण मृत्युंच्या तुलनेत साठ टक्के मृत्यु एकट्या एप्रिल महिन्यात झाले. दिवसाला १६४ लोक मृत्युमुखी पडले. यात नाशिकरोड विभागात सर्वाधिक महिला ७५० तर ४७८ पुरुषांचा मृत्यु झाला.


विभागनिहाय चार महिन्यातील मृत्यु अहवाल
जानेवारी महिन्यात पुर्व विभागात एकुण २४८ मृत्यु झाले. पश्‍चिम ४८०, पंचवटी २९२, नाशिकरोड ११८, सिडको १०६, सातपूर ५२ असे १२९६ मृत्यु झाले. फेब्रुवारी महिन्यात पुर्व २२२, पश्‍चिम ३८४, पंचवटी २३४, नाशिकरोड १२२, सिडको १९०, सातपूर ४८ असे १२०० मृत्यु झाले. मार्च महिन्यात पुर्व ३५०, पश्‍चिम ५४४, पंचवटी ३५३, नाशिक रोड २१२, सिडको १६९, सातपूर ७३ असे १७०१ मृत्यु झाले.
...

चार महिन्यातील मृतांची एकत्रीत संख्या आहे. कोव्हीडमुळे मृत्यु झालेल्यांची आकडेवारी सादर करण्याच्या सुचना खासगी रुगणालयांना दिल्या आहेत. लवकरच ती माहिती प्राप्त होईल. - कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com