शिवसेनेकडून `सिव्हिल`चे ऑपरेशन... नवे व्हेंटिलेटर अडगळीत 

शहरातील करोनाग्रस्तांची दुरावस्था, उपचारासाठी सुरु असलेली परवड या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात अचानक पाहणी दौरा केला. यावेळी ११ नीव व्हँटीलेटर एका अडगळीच्या खोलीत लपवून ठेवलेले आढळले.
Venti Shivsena
Venti Shivsena

धुळे : शहरातील करोनाग्रस्तांची दुरावस्था, उपचारासाठी सुरु असलेली परवड या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात अचानक पाहणी दौरा केला. यावेळी ११ नीव व्हँटीलेटर एका अडगळीच्या खोलीत लपवून ठेवलेले आढळले. 

हा प्रकार लक्षात आल्यावर संतप्त शिवसेना पदाधिका-यांनी सिव्हिल सर्जनला चांगलेच धारेवर धरले. स्विहिल सर्जन डॅा सांगळे ह्यांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली. 

गेल्या आठवड्यात शिवसेनेने पाहणी दौरा केला. यावेळी सिव्हील सर्जन श्री सांगळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आज आमच्याकडे व्हेंटिलेटर नाहीत. जे होते ते सांगलीला पाठवले आहेत. त्यामुळे व्हेंटीलेटर  आमच्याकडे नाहीत. कालच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्हा आढावा बैठकीत देखील डॅा सांगळे यांनी तीच चुकीची माहिती दिली होती. त्यावरून आज सकाळी काही बातम्यांत जिल्हा रुग्णालयात ११ व्हॅटीलेटर धुळ खात पडून आहेत अशी माहिती प्रसारीत झाली होता.  त्यावरून शिवसेनेच्या शिष्टमंडळाला काही मिळालेल्या माहितीनुसार सर्जिकल वार्डच्या मागील कोपऱ्याच्या खोलीत व्हेंटीलेटर आहेत. त्यावरून शिवसेनेच पदाधिकारी तेथे गेले. तेथील एका परिचारीकेला विनंती केली की, आम्हाला ती खोली दाखवा. त्यावरून त्या परिचारीकेने वरिष्ठांशी बोलणे केले. साहेब मीटिंगमध्ये आहेत. अशी उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु वारंवार विनंती केल्यावर त्यांनी दरवाजा उघडला. त्या खोलीत नवे करकरित ११ व्हेंटिलेटर आढळले. 

विनावापर व्हेंटीलेटर ठेऊऩ सिव्हील सर्जन काय करणार होते?.  शहराला कोरोनाने ग्रासले असुन रुग्णांना व्हेंटीलेटर अभावी उपचार मिळत नाही. त्यामुळे ते अजुन किती नागरिकांचा जिव जाण्याची वाट पाहत होते. जर हे व्हेंटीलेटर वेळीच कार्यरत केले असते तर रुग्णांचा जीव वाचवता आला असता. कोरोना महामारीत असा निष्काळजीपणा करणाऱ्या श्री सांगळेला निलंबित करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे.  

यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, जिल्हा उपप्रमुख किरण जोंधळे, मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, डॉ सुशील महाजन, पंकज गोरे, संजय वाल्हे, राजेश पटवारी, सचिन बडगुजर, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, संदीप चव्हाण, केशव माळी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com