शिवसैनिकांचे आठवडाभरात ४९२ रक्तपिशव्या संकलन

कोरोनाच्या आपत्तीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे गेल्या सात दिवसात रोज रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यात ४९२ रक्तपिशव्या संकलित झाल्या.
SS
SS

नाशिक : कोरोनाच्या आपत्तीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे गेल्या सात दिवसात रोज रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यात ४९२ रक्तपिशव्या संकलित झाल्या. 

शहरातील तिडके कॉलनतील धम्म चौक येथे युवा सेनेचे शहर चिटणीस अभिजित गवते व पार्थ सुतार यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन उपनेते माजी मंत्री बबन घोलप व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते झाले.

शिवसेना, युवासेना, भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे आतापर्यंत शालिमार कार्यालय ४७, त्रिमूर्ती चौक (सिडको) ६५, सार्वजनिक वाचनालय (औरंगाबादकर सभागृह) १२५, पंडित कॉलनी (कॉलेज रोड) ७२, हॉटेल आश्विन इन (द्वारका) ५४ व शंकरनगर (टाकळी) ४७ , अशाप्रकारे सात  ठिकाणी झालल्या रक्तदान शिबिरात ४९२ पिशव्या रक्त संकलित झाले आहे. 

कोरोनाकाळात सामाजिक बांधिलकी जोपासत शिवसैनिक खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरला आहे. विविध उपक्रम राबवून त्यांनी सर्वसामान्य जनतेस दिलासा दिला आहे. रक्तदान शिबिरे हा त्याच उपक्रमाचा एक भाग आहे. महिनाभर शिबिरे आयोजित करून आरोग्य यंत्रणेस मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती माजीमंत्री बबन घोलप यांनी दिली. 

तिडके कॉलनीत आयोजित शिबिरात आदित्य देवकुटे, प्रणव लोणकर, रोहित लोणकर, प्रतीक लोणकर, भूषण बोरसे, अजिंक्य कटाले, हार्दिक कुमठ, अथर्व सोनवणे, चाणक्य भाटिया, तुषार धनवटे आदींनी रक्तदान केले. या वेळी युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, शिवसेना मध्य नाशिक शहर संघटक वीरेंद्रसिंग टिळे, जिल्हा कार्यालयप्रमुख राजेंद्र वाकसरे, युवासेना उपमहानगर प्रमुख किरण पाटील, सोमनाथ गुबाडे, मोहन सुतार, प्रवीण गुंभाडे, सागर कर्डक, प्रशांत चंद्रात्रे आदी सहभागी उपस्थित होते.

...
शिवसेना कार्यकर्त्यांचे काम इतरांसाठी आदर्शवत आहे. जनसेवेचा वसा जोपासण्याचे काम यापुढेही अविरत सुरु राहील. ८० टक्के सलमाजकारण हे शिवसेनेचे मुलभूत ध्येय आहे. त्यादृष्टीने कोरोनाची आपत्ती दूर करम्यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत.
- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com