शिवसेनेतील जुन्या- नव्या नेत्यांचा मेळ बसविण्याचे आव्हान

शहराच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे वसंत गिते व सुनिल बागुल हे दोन मोठे नेत्यांची शिवसेनेत घरवापसी झाली. त्यामुळे पक्षाची ताकद ताकद वाढली. हे वरकरणी दिसते. मात्र यातूनच शिवसेनेपुढे आव्हाने निर्माण होऊ शकतात.
Sudhakar Badguja
Sudhakar Badguja

नाशिक : शहराच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे वसंत गिते व सुनिल बागुल हे दोन मोठे नेत्यांची शिवसेनेत घरवापसी झाली. त्यामुळे पक्षाची ताकद ताकद वाढली. हे वरकरणी दिसते. मात्र यातूनच शिवसेनेपुढे आव्हाने निर्माण होऊ शकतात. पडत्या काळात ज्यांनी पक्ष सांभाळला त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होवून गटातटाचे राजकारण टोकदार होण्याचीच भिती निर्माण झाली आहे.

एकेकाळी कॉंग्रेसकडून सत्ता हिसकावत शिवसेनेने नाशिक शहराला बालकिल्ला बनविला होता. बबन घोलप, वसंत गिते, सुनिल बागुल, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सत्यभामा गाडेकर आदी यांच्यासारखे नेते आहेत. या नेत्यांच्या समर्थकांचे मोहोळ असलेल्या पॉवरफुल्ल नेत्यांमुळे शिवसेनेला सुगीचे दिवस पाहायला मिळाले. सध्या त्यात महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, विलास शिंदे यांसह विविध नेत्यांत व ज्येष्ठांत कास मेळ बसवायचा हे खासदार संजय राऊत, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी व श्री. बडगुजर यांना करावे लागेल.  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सुत्रे आल्यानंतर शिवसेनेत धुसफूस सुरु झाली. उध्दव यांनी सेनेत नवीन चेहरे देण्यास सुरुवात केल्यानंतर सेनेची एकहाती सुत्रे हाती असलेल्यांची पकड सैल होत गेली. वैचारिक मतभेदातून एक-एक करत शिवसेनेचे शिलेदार पक्ष सोडू लागले. गिते व बागुल यांच्या पक्षांतरामुळे संघटना पातळीवर शिवसेना खिळखिळी झाली. गिते यांच्यामुळे शहरात मनसेची ताकद वाढली तर श्रमिक सेनेच्या बागुल यांच्याकडील कार्यकर्त्यांचे पाठबळ घटले. कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयात अचानक गर्दी ओसरल्याने ओहोटी लागली. त्या काळात शिवसेनेने नवनेतृत्वाला साद घालत अनेकांचे पक्ष प्रवेश करून घेतले तर इतरांमुळे ज्यांचे नेतृत्व बुजत होते त्यांना देखील शिवसेनेत उभारी मिळाली.

मनसेला गळती लागल्यानंतर अनेकांचे शिवसेना प्रवेश झाले व त्यात निवडून देखील आले. दहा-बारा वर्षाच्या पडत्या काळात शिवसेना संघटना पातळीवर उभी राहीली असताना पक्षातून गेलेल्या गिते-बागुल यांची घरवापसी झाली. जुन्या नेत्यांचे पक्ष प्रवेश झाल्याने पडत्या काळात पक्ष सांभाळलेल्या नेत्यांमधील नाराजीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खासदार संजय राऊत यांनाही या नाराजीची कल्पना आहे. त्यामुळेच दोघांना पक्षप्रवेश देताना शिवसेनेच्या व्यासपीठावर सर्वचं जण एकदिलाने, प्रेमाने बसल्याचे त्यांना सांगावे लागले.

नाराजीचा स्फोट होईल का?
महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्याची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. त्याअनुषंगाने भाजपची संघटना खिळखिळी करण्याचे काम शिवसेनेकडून सुरु आहे. एकीकडे पक्षात दिग्गज नेते घेताना एकाच म्यानेत अनेक तलवारी राहू शकणार नाहीत. यामुळे भाजपला खिळखिळी करताना शिवसेनतच नाराजीचा बॉम्ब फुटण्याची भिती काही कार्यकर्ते व्यक्त करतात. 

शिवसेनेची जुनी लॉबी सक्रिय?
शिवसेनेचे बदलते स्वरुप ध्यानी न आल्याने अनेकांना साईडट्रॅक व्हावे लागले. त्यामुळे पक्षात पुन्हा नव्याने स्थान निर्माण करायचे असेल तर गिते-बागुल यांना परत आणण्यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न केले. फोटो सेशनवेळी गायब झालेले अनेक चेहरे अवतरल्याचे शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसून आले. यामुळे शिवसेनेत पुन्हा जुनी लॉबी सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com