आमदार सरोज अहिरेंच्या लग्नाला शरद पवारांची उपस्थिती! - Sharad pawar blessed MLA Saroj Ahire for Marrige. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार सरोज अहिरेंच्या लग्नाला शरद पवारांची उपस्थिती!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सरोज बाबुलाल अहिरे आणि डॉ. प्रविण वाघ यांचा विवाह समारंभ आज झाला. यावेळी कुटुंबातील सदस्यांसह मोजक्‍या मंडळींनाच निमंत्रीत केले होते. यावेळी ज्येष्ठ नेत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांसह विविध राजकीय नेत्यांनी विवाहाला हजेरी लावली.
 

नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सरोज बाबुलाल अहिरे आणि डॉ. प्रविण वाघ यांचा विवाह समारंभ आज झाला. यावेळी कुटुंबातील सदस्यांसह मोजक्‍या मंडळींनाच निमंत्रीत केले होते. यावेळी ज्येष्ठ नेत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांसह विविध राजकीय नेत्यांनी विवाहाला हजेरी लावली.
आमदार अहिरे यांचा विवाह अतिशय मोजक्‍या मंडळींच्या उपस्थितीत झाला. कालपासून हा समारंभ सुरु होता. आज विवाहाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित राहून नवविवाहीत दाम्पत्यास आर्शिवाद दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, कोंडाजी मामा आव्हाड रवींद्र पगार यांसह विविध नेत्यांनी या समारंभास हजेरी लावली.

पत्रकारांचा रुसवा
या विविहाविषयी आमदार अहिरे यांच्या पक्षाचे सहकारी व निकटवर्तीयांनाही निमंत्रण आणि माहिती नव्हती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांसह अन्य नेते उपस्थित राहणार असल्याने सकाळी पत्रकारांनी समारंभस्थळी गर्दी केली होती. मात्र त्यांनाही सुरक्षा रक्षकांनी रस्त्यावरील प्रवेशद्वारावरच अडविण्यात आले. त्यामुळे विविध पत्रकार मंगल कार्यालयाच्या गेटवर ताटकळत थांबले. शरद पवार येऊन गेल्यानंतर आमदार अहिरे यांनी प्रवेशद्वारावर येऊन पत्रकारांना आत बोलावले. मात्र बराच वेळ ताटकळलेले पत्रकारांनी त्यांना शुभेच्छा देत तेथूनच परतने पसंत केले. त्यामुळे आमदार अहिरेंच्या लग्नात पत्रकारांचा रुसवा चर्चेचा विषय ठरला.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख