कृषी कायद्यांविरोधात राज्यपालांना सहा लाख सह्यांचे निवेदन 

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासह हे कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने देशभरात १० लाख सहया गोळा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात सहा लाख ५४ हजार सह्या संकलीत झाल्या.
Governer
Governer

नाशिक : कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासह हे कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने देशभरात १० लाख सहया गोळा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात सहा लाख ५४ हजार सह्या संकलीत झाल्या. 

यासंदर्भात रविवारी (ता.२८) रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शेतकरी नेते राजू शेट्टी व प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, नितिन मते, राजा कांदळकर, अबिद शेख, चंद्रकांत म्हात्रे, सचिन बनसोडे, रोहित ढाले यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात विविध भागात सहा लाख ७५ हजाराहून अधिक सहयांची निवेदने राष्ट्र सेवा दलाच्या पदाधिका-यांनी स्थानिक पातळीवर तहसिलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना दिले. यावेळी समविचारी पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पाठींबा दिला. 

केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेली तिन्ही शेती विषयक कायदे शेतकरीविरोधी आहेत. त्यातून देशातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. या कायद्यांच्या विरोधात गेली तीन महिने राजधानी दिल्लीच्या सरहद्दीवर शेतकऱ्यांचे अभूतपूर्व अहिंसक पद्धतीने आंदोलन सुरु आहे. त्याची दखल घेण्याऐवजी हे शेतकरी आंदोलन निर्दयपणे दडपण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेती विरोधी तीनही कायदे ताबडतोब मागे घेण्याची मागणी करण्यासाठी ही सह्यांची मोहीम घेण्यात आल्याची माहिती राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी गेले तीन आठवडे पायपीट करून समर्थनाच्या सह्या गोळा केल्या आहेत. यामध्ये राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, शिक्षकभारती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लोकसंघर्ष मोर्चा, एनएपीएम, एस.एम.जोशी सोशालिस्ट फौंडेशन,  विविध शेतकरी संघटना, श्रमिक संघटना, महाराष्ट्र सोशल फोरम, हमाल पंचायत, दक्षिणायन, साहित्यिक, कलाकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
....
   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com