`तुम्हीच सांगा, तोडफोडीशिवाय माझ्या पतीकडे दुसरा काय पर्याय होता !`

गेले महिनाभर आम्ही बिटको रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणेसाठी पाठपुरावा करीत होतो. मात्र कोणीच दाद देत नव्हते. या काळात घरोघरी लोकांचा मृत्यू होताना आम्ही पहात होतो. तरीही ही व्यवस्था दाद देत नव्हती. त्यामुळे माझे पती, भाजप नेते राजेंद्र ताजणे यांच्याकडे तोडफोड करण्याशिवाय दुसरा मार्गच राहिला नाही,
Seema Tajne
Seema Tajne

नाशिक : गेले महिनाभर आम्ही बिटको रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणेसाठी पाठपुरावा (we have taken folloup for bytco hospital Improvement) करीत होतो. मात्र कोणीच दाद देत नव्हते. (No body Given Response) या काळात घरोघरी लोकांचा मृत्यू होताना पहात होतो. ही व्यवस्था दाद देत नव्हती. त्यामुळे माझे पती, भाजप नेते राजेंद्र ताजणे यांच्याकडे तोडफोड करण्याशिवाय दुसरा मार्गच राहिला नाही, असे नगरसेविका सीमा ताजणे (Bjp corporator Seema Tajne explain Husbunds Situation) यांनी सांगितले. 

महापालिकेच्या बिटको कोविड केअर सेंटरमध्ये काल भाजपाच्या नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती व मित्र मेळा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ताजणे यांनी वाहन घुसवून तोडफोड करीत कर्मचाऱ्यांना दमबाजी व शिविगाळ केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला. शहरात खळबळ उडाली. घटनेनंतर अनेक नागरिकांनी या रुग्णालयातील समस्यांबाबत तक्रारी केल्या. या पार्श्वभूमीवर सौ ताजणे म्हणाल्या, काल जो प्रकार घडला, त्याचे मी समर्थन करीत नाही, मात्र तसे का घडले, हे देखील शोधून काढले पाहिजे. याला जबाबदार कोण आहे?. 

सौ. ताजणे म्हणाल्या, या रुग्णालयात परिसरातील अडतीस गावांतून नागरिक उपचारासाठी येतात. त्यांना बेड मिळत नाही. उपचार होत नाहीत. परिचारीका अजिबात लक्ष देत नाही. रेमडेसिव्हिर इंडेक्शन व अन्य औषधे येथे दिली जात नाहीत. असे असेल तर मग महापालिका जो खर्च केल्याचा दावा करते, ती औषधे जातात कुठे?. माझे सासरे येथे उपचारासाठी एक महिन्यापूर्वी येथे उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यासाठी आम्ही कोणतीही विशेष सवलत मागीतली नव्हती. आम्ही रांगेत उभे राहून प्रवेश घेतला. अडीच अडीच तास रांगेत राहून औषधे मिळत होती. कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. जर एका नगरसेविकेच्या सासऱ्यांची अशी अवस्था असेल तर सामान्यांना काय वागणूक मिळत असेल याची तुम्ही कल्पना करा. मात्र त्या घटनेचा रुग्णालयात घडलेल्या तोडफोडीशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

त्या म्हणाल्या, येथील डॅाक्टर धनेश्वर हे अत्यंत चांगले काम करतात. त्यांच्याकडून रुग्णांना चांगला प्रतिसाद दिला जातो. मात्र साडे पाचशे रुग्णांसाठी एक डॅाक्टर काय करणार?. त्यांना जो स्टाफ असायला हवा तो व्यवस्थीत नाही. अत्यंत अपुरे कर्मचारी आहेत. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना त्यांच्यावर मोठा दबाव आहे. ही अपुरी यंत्रणा काय करणार?. त्यासाठी आम्ही सतत गेले महिनाभर प्रशासनाकडे, वरिष्ठांकडे अडचणी मांडत होतो. कमतरता सांगत होतो. सुधारणांसाठी विनंती करीत होतो. मात्र काहीही झाले नाही. थोडेसे कर्मचारी नियुक्त केले. ते देखील अत्यंत कमी वेतनावरचे होते. त्यामुळे कोणीही मनापासून काम करीत नव्हते. परिसरातील, संपर्कातील नागरिक मदत मागायला येत होते. रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी सतत फोन करीत होते. भेटून सांगत होतो. मात्र कोणीही प्रतिसाद देत नव्हते. एका नगरसेवकालाही इथे किंमत नाही. मग नगरसेवक होऊन काय उपयोग?. याचा कोणालाही राग येईल. त्यामुळे माझ्या पतीकडे लोक तक्रारी घेून येत. मात्र आम्हाला त्या सोडवता येत नव्हत्या. 

शिवसेनेच्या (कै) नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनीयाच प्रश्नावर बिटको रुग्णालयात आंदोलन केले. त्यावेळी त्या आजारी होत्या. नागरिकांच्या तक्रारी असल्याने त्यांनी आंदोलन केले. त्यांचे निधन झाले आहे. त्या राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेच्या नेत्या होत्या. मात्र त्यांनी केलेल्या आंदोलनाचा काहीच उपयोग झाला नाही. याची खंत वाटते. अशा स्थितीत माझ्या पतींनी शनिवारी सायंकाळी जे केले, त्यामागे त्यांची मनस्थिती लक्षात घ्यावी लागेल. तोडफोड करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काय मार्ग शिल्लक राहिला होता. आपल्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी तोडफोड केली.
...      

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com