रक्षा खडसे म्हणल्या, भाजप की राष्ट्रवादी या कुंपणावर बसू नका! - Raksha Khadse says dont wait on BJP or NCP Border, Jalgao Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

रक्षा खडसे म्हणल्या, भाजप की राष्ट्रवादी या कुंपणावर बसू नका!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 जून 2021

एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात गेले आहेत. नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्री. खडसे यांच्या निवासस्थानी खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. तेव्हापासून त्या कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खडसे यांनी काल भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. 

सावदा : एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात गेले आहेत. (Political new version after Eknath Khadse joine NCP) कतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्री. खडसे यांच्या निवासस्थानी खासदार रक्षा खडसे (Devendra Fadanvis visits Khadse`s House) यांची भेट घेतली. तेव्हापासून त्या कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खडसे यांनी काल भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा, (M.P. RakshaKhadse said prepare for Upcoming Election)  अशा सूचना दिल्या आहेत. 

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पण, त्यांचे अनेक समर्थक भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत दिसतात. याची चर्चा व धागा पकडून नेत्यांनी या वेळी खडसे समर्थक, नगरसेवक व कार्यकर्त्यांना उद्देशून कार्यकर्त्यांनी भाजप की राष्ट्रवादीच्या कुंपणावर न बसता कोणती तरी एक स्पष्ट ठोस भूमिका घेऊन पक्षकार्य करावे, असा सल्ला काही कार्यकर्त्यांना नाव न घेता या बैठकीत दिल्याचे समजते.

आगामी पालिका निवडणुका समोर ठेवून कार्यकर्त्यांनी संघटन कार्याला गती द्यावी व भारतीय जनता पक्षाची मजबूत फळी उभी करून व्यापक जनहिताचे कार्य करावे, असा सल्ला खासदार रक्षा खडसे यांनी येथील भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिला. येथील खिरोदा रस्त्यावरील गणपती मंदिरात बैठक झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सुरेश धनके, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, नगराध्यक्षा अनिता येवले, डॉ. अतुल सरोदे, शिवाजी पाटील, महेश चौधरी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, अजय भारंबे, लीना चौधरी, करुणा पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीत संघटनात्मक पुनर्रचनेसाठी आगामी काळात पक्ष संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य करण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची नावे उपस्थितांमधून घेतली. त्यात अक्षय सरोदे, हरीश इंगळे, लतेश चौधरी, जितेंद्र भारंबे, गजानन भार्गव, सागर चौधरी, सचिन बऱ्हाटे यांचा समावेश आहे. संघटनात्मक वर्तणूक व पक्षनिष्ठा या विषयावर नंदकिशोर महाजन यांनी कार्यकर्त्यांना वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवून पक्षवाढीचा संदेश दिला. तर डॉ. अतुल सरोदे यांची कोविडच्या राष्ट्रीय समितीत निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांनी समर्पित वृत्तीने व निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये भवितव्य आहे, असे सांगितले. तालुकाध्यक्ष राजन लासूरकर यांनी शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची नावे जिल्हा समितीकडे ठेवली. त्यातून एका कार्यकर्त्याची निवड करण्यात येईल, असे सांगितले.

बैठकीला भाजप मुक्ताईनगर विधानसभा सहक्षेत्रप्रमुख सी. एस. पाटील, रावेर तालुका सरचिटणीस महेश चौधरी, भाजप महिला आघाडी अध्यक्षा रेखा बोंडे, महिला आघाडी सरचिटणीस सारिका चव्हाण, रावेर तालुका माजी अध्यक्षा नेहा गाजरे, शहराध्यक्ष पराग पाटील, महेश अकोले नगरसेविका रंजना भारंबे, करुणा पाटील, लीना चौधरी, गटनेते अजय भारंबे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, अतुल ओवे, अतुल नेहेते, जितेंद्र गाजरे, हरीश इंगळे, महेश अकोले, संतोष परदेशी, गजानन भार्गव, अक्षय सरोदे, लतेश चौधरी, विजय पाटील, सागर चौधरी, भारत चव्हाण, प्रतीक भारंबे, लतेश सरोदे, सचिन बऱ्हाटे, राकेशकुमार पाटील, कमलेश भारंबे, राजकिरण बेंडाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
...

हेही वाचा...

संभाजी मोरुस्कर यांनी सत्ताधारी भाजपला जागे केले?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख