विलासरावांनी जन्म दिलेला कारखाना सुरू ठेवणे आमचे कर्तव्य!

केंद्रामध्ये मंत्री असतांना तत्कालीन अवजड उद्योग मंत्री (कै) विलासराव देशमुख यांनी मांजरा परिवारातील एक कारखाना म्हणून बेलकुंडच्या मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याला जन्म दिला.
Amit Deshmukh
Amit Deshmukh

औसा : केंद्रामध्ये मंत्री असतांना तत्कालीन अवजड उद्योग मंत्री (कै) विलासराव देशमुख यांनी मांजरा परिवारातील एक कारखाना म्हणून बेलकुंडच्या मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याला जन्म दिला. त्यांची भावनिक जवळीक या करखाण्याशी नेहमी राहिली. त्यामुळे हा कारखाना सुरु ठेवणे हे माझे कर्तव्य आहे असे, वैधकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

कारखान्याच्या सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अनेकवेळा (कै) विलवासरावांचे पाय या कारखान्याला लागले. आता तो कारखाना सुरू करणे हे माझे कर्तव्य असल्याने राजकारण बाजूला ठेवून संस्था जपण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत हा कारखाना ताब्यात घेतला. तो चालू होतो की नाही अशी शंका कोणीही घेऊ नये. या कारखाण्याची चाचणी गळीत ही मार्चमध्ये कुठलाही परिस्थितीत झाली पाहिजे.

ते म्हणाले, हा कारखाना सुरु ठेवण्यासाठी चोवीस तास काम करायची पाळी आली तरी हयगय करू नका असे आवाहन वैधकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. आज ते कारखान्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले असतांना बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, कारखान्याचे अध्यक्ष बजरंग बाजुळगे, पृथ्वीराज सिरसाट, ऍड किरण जाधव, समद पटेल यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ व शेतकरी सभासद उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, अत्यंत अडचणीत असलेला हा कारखाना सुरू करण्यासाठी त्यावर असलेल्या कर्जाचे पुनर्गठन करून पुन्हा नव्याने कर्ज उपलब्ध करून घेतले त्यासाठी शासनाची थकहमी आदी प्रश्न सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोडविले. विलासराव देशमुखांचा जीव असलेला हा कारखाना सुरू करण्यासाठी जे जे करता आले ते आम्ही केले. हा कारखाना मांजरा परिवारातील असल्याने डिस्लेरी व इतर पूरक प्रकल्प यातून उभे राहिले पाहिजेत. हा कारखाना पुन्हा उभा राहत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे यातून शंभर ते दीडशे कामगारांना काम मिळणार असून यातून उसउत्पादक शेतकऱ्यांनाही चांगले दिवस येणार आहेत.
कारखाना पळणार

कारखाना सुरू होणार की नाही याबाबत पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले की हा कारखाना नुसता चालू होणार असे नाही तर तो पळणार आहे. आणि तो तीन वर्षे पूर्ण क्षमतेने चालणार सुद्धा असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

यावेळी मांजराचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे यांनी हा कारखाना सुरू करण्याची ही पहिली आणि शेवटची संधी असल्याचे नमूद करीत हा कारखाना सुरू व्हावा यासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख व पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह जिल्हा बँकेचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे आता कारखाना सुरू होणारच याचा विश्वास शेतकरी सभासदांना आला आहे.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com