पोलिस कोविड सेंटरमधील रुग्ण घेताहेत सूर्यस्नानाचा लाभ

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये पोलिस दलामधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैदयकीय सुविधा देण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतुन `पोलीस कोविड केअर सेंटर’ सुरु झाले.
Sun Bath
Sun Bath

नाशिक : कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये पोलिस दलामधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैदयकीय सुविधा देण्यासाठी  पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतुन `पोलीस कोविड केअर सेंटर’ सुरु झाले. 

या सेंटरमध्ये १९८ पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांचे नातेवाईक यांनी उपचार घेवुन पुर्णतः बरे झाले होते. १७० होम कोरंटाईन रूग्णांना त्यांचे घरी जाऊन उपचार करण्यात आले होते.  ६५० रूग्णांची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट करण्यात आली.त्यावेळी पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रूग्णांना वैदयकीय उपचारासोबतच अभ्यासपुर्वक व्यायाम व डाएट प्लॅन पोलीस आयुक्तांनी वैदयकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तयार केला होता. त्यात सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपेपावेतो सकाळचे सुर्यस्नान,  पेरू, सफरचंद केळी आदी फळांचा नास्ता,  अनुलोम-विलोम प्राणायाम, वरण, वरईचा भात, नाचणीची भाकरी, उकडलेली भाजी (फक्त हळद व काळी मिरी टाकुन), सलाद असे जेवण, सायंकाळी पुन्हा सुर्यस्नान, रात्रीच्या जेवणामध्ये पेरू, सफरचंद, केळी इ.फळे व हळद, काळी मिरी पावडरसह दुध अशा प्रकारचा व्यायाम व डाएट ठेवण्यात आला होता. त्यामुळे सर्व रूग्ण ठण-ठणीत बरे झाले होते व कोणीही रूग्ण क्रिटीकल झाले नव्हते, असा दावा प्रशासनाने केला आहे.  

शहरात यंदा पुन्हा कोविड-१९ आजाराचा प्रार्दुभाव सुरू झाल्याने व मोठया प्रमाणात रूग्ण संख्येत वाढ होवु लागल्याने आयुक्त पांडे यांनी पोलिस कोविड केअर सेंटर’’ पुन्हा कार्यान्वयीत केले. त्यामध्ये पुरूषांसाठी ६०, महिलांसाठी ४० अशा १०० बेडची सुविधा आहे. त्यात ६ ऑक्सीजनबेड आहेत. श्वसनक्रियेची क्षमता तपासण्यासाठी सहा मिनीटे चालण्याची चाचणी घेवुन रग्णाची पुढील उपचाराची  दिशा ठरविली जाते. याप्रमाणे वैदयकीय पथकास कोविड रूग्णांवर उपाचार करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे अद्याप कोणीही रूग्ण क्रिटीकल झालेला नाही. 

या केंद्रात सध्या सूर्यस्नानाचा देखील उपचार म्हणून स्विकार करम्यात आला आहे. नियमीत सुर्यस्नान घेतल्याने सुर्यप्रकाशामुळे शरिरातील कोलेस्टरॅालचे ’डी’ जिवसत्वामध्ये रूपातंर होते. रक्तातील कॅल्शीअमचे चयापचय होऊन हाडे व स्नायु मजबुत होतात. सुर्यप्रकाशामुळे शरीरात सेरेटोनिन नावाचे हार्मोन्स श्रावते व त्यामुळे मानसिक स्वास्थ टिकुन राहण्यास मदत होते. पिनीअल ग्रंथीमधुन दिवसा मेलॅनिन व रात्री मॅलॅटोनिन नावाचे हार्मोन श्रावते. त्यामुळे शांत झोप लागते. अशाप्रकारे सुर्यस्नान कोरोनाच्या रूग्णांसाठी अतिशय लाभदायक असून कोरोनाच्या सूर्यस्नानाचा हा उपचार चर्चेचा विषय ठरला आहे. 

ग्रामीण पोलिसांसाठी केंद्र
नाशिक ग्रामिणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी पोलीस कोविड सेंटरला भेट देऊन सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या उपचार, व्यायाम, सुविधांची पाहणी केली. कोविड सेंटरमध्ये दाखल रूग्णांशी संवाद साधला. अद्ययावत पोलिस कोविड सेंटरचा आदर्श डोळयासमोर ठेऊन, लवकरच नाशिक ग्रामिण पोलिसांसाठी  आडगांव येथील मुख्यालयात स्वतंत्र पोलीस कोविड केअर सेंटरची उभारणी करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com