पांडेजींचा नेत्यांना दणका, होर्डिंग लावाल तर याद राखा!

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हेगार आणि राजकीय नेत्यांना यापूर्वी चांगलाच दणका दिला होता. आता त्यांनी ऊठ सुठ शहरभर पोस्टर लावुन चमकोगिरी करणाऱ्यांवर त्यांची दृष्टी पडली आहे. पांडेजींनी नेत्यांना ठणकावले आहे.
Deepak Pande
Deepak Pande

नाशिक : पोलिस आयुक्त (Police commissioner) दीपक पांडे (Deepak Pande) यांनी गुन्हेगार (Criminals) आणि राजकीय नेत्यांना (Political leaders) यापूर्वी चांगलाच दणका दिला होता. आता त्यांनी ऊठ सुठ शहरभर पोस्टर (Posters) लावुन चमकोगिरी करणाऱ्यांवर त्यांची दृष्टी पडली आहे. पांडेजींनी नेत्यांना ठणकावले आहे, `होर्डींग लावाल तर याद राखा, पोलिसांची परवनागी सक्तीची )police permission compulsory) आहे`

शहरात महापालिका प्रशासनाने निश्चित करून दिलेल्या जागांवर होर्डिंग्ज लावण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून पूर्व परवानगी मिळविणे आवश्यक राहणार आहे. पोलिस आयुक्तालयाच्या मंजुरीशिवाय शहरात होर्डिंग लावल्यास संबंधितांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे. याबाबत लवकरच अधिसूचना काढली जाणार आहे. 

गणेशोत्सव, आगामी नवरात्रोत्सव, दीपावली, तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात फलकबाजीला उधाण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेसुमार फलक लावून विद्रूपीकरणामुळे फलकबाजीवर नियंत्रण राहावे आणि कुठल्याही प्रकारे कोणीही कोणाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर अथवा चित्र असलेले फलक शहरात लावू नये, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल यासाठी मनपा प्रशासनाने जाहिरातीसाठी परवानगी देताना संबंधित जाहिरातकर्त्याचा आलेला अर्ज व जाहिरातीचा आशय मंजुरीसाठी अगोदर पोलिस आयुक्तालयाकडे पाठविणे बंधनकारक राहणार आहे. 

पोलिस आयुक्तालय स्तरावर पडताळणी केल्यानंतर संबंधित जाहिरात अर्जाची नोंद लेखी स्वरूपात करून त्यास परवानगी क्रमांक दिला जाईल. त्यानंतरच मनपाकडून संबंधिताला होर्डिंग्ज लावण्यासाठी अधिकृत ठिकाणी परवानगी दिली जाईल, असे पांडे यांनी स्पष्ट केले आहे. होर्डिंग लावताना त्यावर दर्शनी भागात मनपा, पोलिस यांचा परवानगी क्रमांकदेखील लिहिणे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा सदर होर्डिंग बेकायदेशीर समजण्यात येईल आणि मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ते तत्काळ काढून नष्ट केले जाईल. पोलिस आयुक्तालयाकडून अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. 

शहरात बेसुमार होर्डिंगमुळे विद्रूपीकरण केले जाते. महापालिकेला कर देऊन होर्डिंग लावताना अनेक भागात ठराविक होर्डिंगचे पैसे भरून त्याहून जास्त प्रमाणात चौकाचौकात होर्डिंग लावून विद्रूपीकरणाचे प्रकार होतात. एकावेळी महापालिकेला कर आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय संबंधित होर्डिंगवर पोलिस परवानगीचा क्रमांक प्रसिद्ध करावा लागणार असल्याने त्यातील गैरप्रकार टाळले जाणार आहे. 

...
पोलिस आयुक्तालयाच्या मंजुरीशिवाय शहरात होर्डिंग लावल्यास संबंधितांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल. यासंदर्भात लवकरच अधिसूचना काढली जाणार आहे. 
- दीपक पांडे, पोलिस आयुक्त. 
... 
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com