`ओबीसी` आंदोलनाविरोधात पोलिसांचा आज गनिमी कावा? 

ओबीसी आरक्षणप्रश्‍नी केंद्र सरकारविरोधात आज सकाळी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दिला आहे. आंदोलनावेळी सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेण्यात येईल, असे समता परिषदेने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिस गनिमी कावा करणार आहेत.
OBC Nashik
OBC Nashik

नाशिक : ओबीसी आरक्षणप्रश्‍नी केंद्र सरकारविरोधात आज सकाळी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा (Agitation for OBC reservation issue by Samata Parishad) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दिला आहे. आंदोलनावेळी सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेण्यात येईल, (Various OBC Association will joined agitaion) असे समता परिषदेने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिस गनिमी (Police prepare to handle agitaion With special plans) कावा करणार आहेत. 

यासंदर्भात पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून रात्री संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. काहींना ताब्यात घेण्याचीही योजना आहे. मात्र यात थेट पालकमंत्री छगन भुजबळांची संघटना व त्यांचे समर्थक सहभागी होणार आहेत. त्यामुळे पोलिसांना जपून कारवाई करावी लागेल. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासह अन्य बाबतीत पोलिसांनी गनिमी कावा डोळ्यापुढे ठेऊन योजना आखल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  

पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार लेखी पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नाशिकमधील आंदोलनासाठी ईदगाह मैदानाची जागा निश्‍चित केली आहे. त्यामुळे द्वारका चौकात आंदोलन करू नये. सार्वजनिक ठिकाणी गर्दीतून कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन होऊन दखलपात्र, अदखलपात्र गुन्हा होण्याची शक्यता आहे. अशा आशयाची नोटीस नाशिक पोलिसांनी समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना बजावली आहे.

शहरातील द्वारका चौक भागात गुरुवारी सकाळी अकराला हे आंदोलन होईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी आणि ओबीसी जनगणनेसह विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार विरुद्ध हे आंदोलन होईल. आंदोलनप्रश्‍नी भुजबळ फार्म कार्यालयात संघटनेची सलग दोन दिवस बैठक झाली. श्री. खैरे म्हणाले, की पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहेत. सामाजिक पातळीवर सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोचविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा, शहर व तालुका पातळीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनीही आंदोलनाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. जे लोक आंदोलनात सहभागी होणार नाहीत, त्यांना कुठल्याही निवडणुकीत मत दिली जाणार नाहीत, अशी भूमिका काही ओबीसी संघटनांनी घेतली असल्याची माहिती श्री. कर्डक यांनी दिली. शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, नगरसेवक संतोष गायकवाड, माजी नगरसेविका कविता कर्डक, ॲड. तानाजी जायभावे, लक्ष्मण जायभावे, समाधान जाधव, अरुण काळे, बाराबलुतेदार संघटनेचे अरुण नेवासकर, दिलीप तुपे आदी उपस्थित होते.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com