मोदीजी, गरीब कल्याण अन्न योजना सुरु करा!

राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, फैलाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याअनुषंगाने सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नसुरक्षा योजना पुन्हा सुरु करावी.
Modi-Bhujbal
Modi-Bhujbal

नाशिक : राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, फैलाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याअनुषंगाने सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नसुरक्षा योजना पुन्हा राबविण्याची मागणी मंगळवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. 

श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या साठ हजारांच्या आसपास पोचली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी कडक निर्बंध राज्यात लावण्यात येणार आहेत. त्यामुळे केंद्राच्या योजनेची पुन्हा एकदा गरज आहे. मागील लॉकडाउनच्या काळात राज्य सरकारने केंद्राची ही योजना यशस्वीपणे राबविली. एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० पर्यंत सुरू असलेल्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले होते. त्याचप्रमाणे मे २०२० मध्ये केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत जाहीर केल्याप्रमाणे मे २०२० आणि जून २०२० मध्ये राज्य सरकारने तांदूळ आणि हरभराडाळ राज्यातील रेशनकार्ड नसलेल्या ४२ लाख ३० हजार ७३५ जनतेला वितरित केली आहे. 

महिन्याला चार लाख टन धान्य 
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यासाठी सध्या एक लाख ४० हजार टन तांदळाची, तर दोन लाख ४० हजार टन गव्हाची गरज आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या सहा कोटी ४७ लाख लाभार्थ्यांपर्यंत आपण हे धान्य पोचवू शकतो. त्याचबरोबर एक कोटी ५१ लाख कार्डधारक लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी १५ हजार १०० टन तूरडाळीची गरज आहे. राज्याला पुढील सहा महिन्यांसाठी २५ लाख टन म्हणजेच प्रत्येक महिन्याला चार लाख टन धान्य उपलब्ध करून देण्याची विनंती श्री. भुजबळ यांनी श्री. मोदी यांना केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com