कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची बाळगू नका भीती  - People shall not scare of Third covid19 wave, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची बाळगू नका भीती 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उद्‍भवलेल्या प्रश्‍नांची सोडवणूक यशस्वीपणे केली आहे. तज्ज्ञांनी वर्तवलेल्या तिसऱ्या लाटेसाठी खासगी रुग्णालयांच्या सहभागातून शासकीय यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती बाळगू नये, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

नाशिक : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उद्‍भवलेल्या प्रश्‍नांची सोडवणूक यशस्वीपणे केली आहे. (Administration solve the hurdles of second covid19 wave) तज्ज्ञांनी वर्तवलेल्या तिसऱ्या लाटेसाठी खासगी रुग्णालयांच्या सहभागातून शासकीय यंत्रणा सज्ज आहे. (We are prepared for third wave, people shall not worry) त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती बाळगू नये, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांनी सांगितले. 

अर्थात जनतेने मास्क वापरत, शारीरिक अंतर ठेवावे, हात स्वच्छ धुवावेत या त्रिसूत्रीचा अवलंब सक्तीने करावा. त्याची गरज आहे, यावर देखील त्यांनी भरल दिला. 

श्री. गमे म्हणाले, की तिसऱ्या लाटेसाठी विभागाकरिता टास्क फोर्सतर्फे ८५० टन ऑक्सिजनच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात एक हजार २५० टन ऑक्सिजनचे नियोजन केले आहे. १९१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रकल्प उभारला जात आहे. कॉन्सन्ट्रेटर, ड्युरा आणि जम्बो सिलिंडर घेण्यात आलेत. नाशिकमधील दुर्घटनेच्या अनुषंगाने पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी देखभाल-दुरुस्तीवर लक्ष दिले जाईल. रुग्णालयांचे अग्निसुरक्षा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने पर्यायी व्यवस्थेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खाटांची संख्या वाढवण्यात येत आहे. नाशिकमध्ये जिल्ह्याप्रमाणे धुळे, जळगाव, नगर जिल्ह्यांतील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने त्यादृष्टीने उपाययोजनांमध्ये विचार करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील एका गावात डेल्टाचे सात रुग्ण आढळले. गावबंद करत १८६ नमुने घेण्यात आले. 

सद्यःस्थितीत कोरोना रुग्णसंख्या धुळे, नंदुरबार जिल्ह्यात नाही. मात्र नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील स्थिती चिंताजनक आहे. नाशिक जिल्ह्यात दोन हजार, तर नगरमध्ये साडेतीन हजार रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे खबरदारी घ्यावी लागेल. अर्थचक्र चालावे म्हणून निर्बंध कमी करण्यात आले आहेत. मात्र त्याचा स्वैराचार चाललाय. पर्यटनस्थळावर गर्दी होत आहे. ग्रामीण भागात सायंकाळनंतर कार्यक्रम होत आहेत. इगतपुरीमध्ये खासगी बंगल्यात पार्टी झाल्याचे पुढे आले, असे सांगून श्री. गमे म्हणाले, की कमी वयाचे लोक आणि मुलांमध्ये तिसऱ्या लाटेच्या संसर्गाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यादृष्टीने उपचारासाठी तयारी सुरू आहे. दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटातील, पहिल्या लाटेत साठ वर्षांहून अधिक वयोगटात मृत्यूचे प्रमाण आढळले. या मृत्यूंचे परीक्षण केल्यावर रोजगारासाठी तरुण बाहेर पडल्याने मृत्यू वाढले. त्यामुळे याही वयोगटाकडे लक्ष द्यावे लागेल. 

‘सकाळ'ची पहिल्या लाटेत साथ! 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ‘सकाळ’ने सक्रिय साथ दिली. ही आठवण सांगत श्री. गमे म्हणाले, की दीड वर्षापूर्वी मी नाशिक महापालिकेचा आयुक्त होतो. त्या वेळी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसे पुढे जायचे, यासंबंधीची माहिती ‘सकाळ’कडून मिळाली. मग ऑनलाइन बैठक घेत एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. भारतीय जैन संघटनेने २५ मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिल्या आणि सर्वेक्षणाला चाचण्यांची जोड देण्यात आली. परिणामी, १४ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. जनता, प्रशासन, माध्यम, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र काम करण्यातून जनतेला मदत होऊ शकते, याचे चांगले उदाहरण पुढे आले. 

यावेळी ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी श्री. गमे यांचे स्वागत केले. 
...
हेही वाचा...

अरे, बारामती, बारामती काय करता?. बारामतीनेच आरक्षण दिले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख