आपली वाट मनुवाद्यांपासून दूर नेणारी आहे, हे लक्षात ठेवा! - Our path is taking us away from manu followers should always remember, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

आपली वाट मनुवाद्यांपासून दूर नेणारी आहे, हे लक्षात ठेवा!

संपत देवगिरे
गुरुवार, 1 जुलै 2021

सत्यशोधक चळवळीचं काम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येऊन ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही ब्रीद वाक्य घेऊन मविप्र ही संस्था गेल्या १०७ वर्षापासून समाजाला आपली सेवा देत आहे. सत्यशोधक विचारसरणीवर काम करून बहुजन समाजाची सेवा करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक : सत्यशोधक चळवळीचं काम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येऊन ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही ब्रीद वाक्य घेऊन मविप्र ही संस्था गेल्या १०७ वर्षापासून समाजाला आपली सेवा देत आहे. (MVP`s cause is to educate society, wellbeing of society from 107 years)  सत्यशोधक विचारसरणीवर (serve society on the path of Satyashodhak heterodoxy) काम करून बहुजन समाजाची सेवा करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या उदाजी महाराज पवार शैक्षणीक वारसा संग्रहालयाचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, अनेकांना इतिहास माहिती नसतो. तो माहिती करून घेतला पाहिजे. मुलांना शिक्षण घेऊ देत नव्हतो. विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकासाठी येणाऱ्या महिलांची अडवणूक होत असे. धमकावले जात होते. अशा वेळी प्रत्यक्ष शाहू महाराजांना इथे यावे लागले. त्यानंतर या संस्थेला राजाश्रय दिले. आजही तो सुरु आहे. मात्र वसंतदादा, शरद पवार यांना माननारे जे लोक आहेत, त्या सगळ्यांचा पोत सत्यशोधक समाज व बहुजन समाजाची सेवा होता.

त्याकाळी ते लोक बहुजन समाजाला शिकू का देत नव्हते?. काय कारण होते. त्यामागे मनुवाद होता. आजही हा मनुवाद विविध रुपांत आपल्यासमोर येत असतो. अशावेळी अतिशय सावधगिरीने पावले टाकण्याची गरज आहे. सत्यशोधक समाजाच्या मार्गाने जाणारे, सगळ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे, ही आपली वाट आहे. आपली वाट मनुवाद्यांपासून दूर नेणारी आहे. मनुवाद्यांच्या जवळ जाणारी आपली वाट नाही. हे आपण विसरता कामा नये. देशात जे सगळे प्रश्न निर्माण झालेत, त्याला महिलांना, बुहजनांना शिक्षण मिळाले नाही म्हणून निर्माण झालेत. महिलांना शिक्षण देणारी युरोप, अमेरिका पुढे गेली. महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी शिक्षणाचा प्रसार केला. शाहू महाराजांनी तर त्याच्याही पुढे जाऊन काम केले. नव्या पिढीने हा इतिहास समजून घेतला पाहिजे. 

ते पुढे म्हणाले, अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय असे संग्रहालय निर्माण करण्यात आलेले आहे. संस्था अधिकाधिक उज्वल कशी होईल, गरिबांना शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी मदत होईल, 

कार्यक्रमापुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नाशिकचे शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नामकरण, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज नवीन इमारत उदघाटन आणि उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण करुन प्रत्येक स्थळाची पाहणी करुन माहिती घेतली. तसेच त्यांनी यावेळी  स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले व सर्व कर्मवीरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, उपसभापती राघोनाना आहिरे, चिटणीस डॉ. सुनिल ढिकले आणि मविप्र संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 
...

हेही वाचा...

अजितदादा म्हणाले, समोर देखील काही पवार असतील ना?
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख