ठाकरे क्रिडा संकुलात 295 बेडचे कोरोना रुग्णालय

मेट- भुजबळ नॉलेज सिटी, महानगर पालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुल येथे २९५ बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.
Covid NCP
Covid NCP

नाशिक : मेट- भुजबळ नॉलेज सिटी, महानगर पालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुल येथे २९५ बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. 

आज (ता. १८) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्याचे ऑनलाइन लोकार्पण झाले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. 

नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे नाविन्यपूर्ण सेंटर प्रथमच उभे राहत आहे. या कोविड सेंटर मुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. 

या कोविड केअर सेंटरसाठी भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून प्रख्यात सर्जन डॉ. अभिनंदन जाधव यांच्यासह ५ एमबीबीएस व ४ बीएचएमएस असे १० डॉक्टर तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कोविड सेंटरसाठी एक अॅडमीन, तीन फार्मसी ऑफिसर, पाच रिसेप्शनिस्ट, १५ वार्ड बॉय, १० सिक्युरिटी गार्ड भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉक्टर तसेच  शहरातील नामांकित फिजिशियन डॉ. शितल गुप्ता आणि डॉ. अतुल वडगांवकर यांचेही सहकार्य लाभणार आहे. रुग्णांना ने-आण, संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

हे कोविड केअर सेंटर मेट- भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्यातून उभारण्यात आले आहे. सामाजिक दायित्वातुन उभारलेले आणि ऑक्सिजन बेड्स असलेले हे एकमेव कोविड केअर सेंटर आहे. या ठिकाणी रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे पौष्टिक  जेवण, अंडी आणि  नाश्ता, फळांचा रस, चहा, रात्रीचे हळदयुक्त दुध, शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com