नाशिकला राष्ट्रवादीने कमावले...शिवसेनेने गमावले!

तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाला सर्वाधीक जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला अनेक गावांतील सत्ता गमवावी लागली तरीही हा पक्ष दुस-या क्रमांकावर होता.
Grampanchayat
Grampanchayat

नाशिक : तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाला सर्वाधीक जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला अनेक गावांतील सत्ता गमवावी लागली तरीही हा पक्ष दुस-या क्रमांकावर होता. मात्र भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व कुठेच जाणवले नाही. त्यांना जागाही मिळाल्या नाहीत. त्या तुलनेत कॅांग्रेसने मोजकी मात्र लक्षणीय कामगिरी केली.  

नाशिक तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पॅनेलच्या नेत्यांना राजकीय पक्ष चिकटलेला होता. त्यामुळे पॅनेलमधील उमेदवारांना पक्ष नसला तरीही एकंदर तालुक्यात राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाला सर्वाधीक जागा मिळाल्या आहेत. मुंगसरे, मातोरी, तिरडशेत, विल्होळी, आंबेबहुला, रायगडनगर, लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी, दोनवाडे, नानेगांव, शेवगेदारणा, बेलतगव्हाण, मोहगाव -बाभळेश्वर, हिंगणवेढे, पिंप्रीसैय्यद, विंचुरगवळी, माडसांगवी, शिलापुर, लाखलगांव, पळसे, शिंदे, चांदगिरी, जाखोरी आणि कालवी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या प्रस्थापितांना हादरा बसला.  

या निकालांत शिवसेना चर्चेत असली तरी त्यांना माडसांगवी, लहवीत आदी मोजक्याच ठिकाणी तुरळक उमेदवारांना यश मिळाले.  शिंदे येथे कॅांग्रेसचे रतन जाधव यांच्या निमित्ताने काँग्रेसला यश मिळाले आहे. पळसे गावात मनसेचे सुनील गायधनी यांच्या मोतोश्री विजयी झालेल्या आहेत. यापलीकडे कॅांग्रेस आणि मनसेला विजय मिळाला. भाजपला नाशिक तालुक्यात कुठेही अस्तित्व दाकवता आले नाही. भाजपचा यापूर्वी देखील नाशिक तालुक्यात प्रभाव नव्हता. सद्यस्थितीत त्यात काहीच बदल झालेला नाही. तालुक्यात भाजपच्या शाखा काही ठिकाणी आहे. मात्र त्या पदाधिकारी, नेत्यांचा गावाच्या राजकारणात प्रभाव नाही अशी चर्चा आहे. तालुक्यात भाजपला आपली पाळेमुळे रोवण्यासाठी खूपच नियोजन करावे लागणार आहे. 

राष्ट्रवादीचे श्रेय शरद पवारांना  
नाशिक तालुका अर्थात देवळाली विधानसभा मतदारसंघातील निकालांवर विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव जाणवतो. मात्र या यशामध्ये पक्षाच्या विविध नेत्यांच्या अप्रत्यक्ष प्रभाव आहे. या नेत्यांनी स्वतःच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी आपल्या आपल्या प्रभावक्षेत्र व गावांत डावपेच आखले. यशाला अनेक वाटेकरी असतात. अपयशाचे वाटेकरी व्हायला शक्यतो कोणीही पुढे येत नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादी कॅांग्रेसला मिळालेल्या यशाचे श्रेय कोणाला याचे उत्तर विजयी उमेदवार, मतदारांनी मात्र शरद पवार यांनाच दिला आहे. 

तालुक्यात राष्ट्रवादी कॅांग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. या विजयाचे सर्व श्रेय शरद पवार यांच्या नेतृत्वाला जाते. कारण त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्यामुळेच मतपरिवर्तन झाले. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरले.
- गणेश गायधनी, अध्यक्ष, नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com