आता राष्ट्रवादीची एक सदस्यीय वॉर्ड रचनेची मागणी

शिवसेनेने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु करीत दोन सदस्यीय प्रभागरचनेवर भर दिला आहे. तशी मागणीही त्यांनी केली. मात्र राष्ट्रवादी कॅांग्रेसने शिवसेनेला अडथळा आणत एक सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी केली आहे.
Sameer Bhujbal
Sameer Bhujbal

नाशिक : शिवसेनेने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु करीत दोन सदस्यीय प्रभागरचनेवर भर दिला आहे. तशी मागणीही त्यांनी केली. मात्र राष्ट्रवादी कॅांग्रेसने शिवसेनेला अडथळा आणत एक सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी केली आहे. त्यामुळे प्रत्येक इच्छुक सोय, गैरसोयीच्या राजकारणाच्या चर्चेत व्यस्त झाला आहे. 

नाशिक महानगरपालिका निवडणुका काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामाला लागली आहे. प्रभाग रचना व इतर महत्वांच्या विषयावर राष्ट्रवादी भवन येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, अशोक सावंत, मनपा गटनेते गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, जीवन रायते, कुणाल बोरसे, मुजाहिद शेख, प्रशांत वाघ आदी उपस्थित होते.

महानगरपालिका निवडणुकीस सव्वा वर्ष शिल्लक आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. प्रभाग निहाय बैठका सुरु आहेत. शहरात वातावरण निर्मिती केल्यावर जनतेत जाऊन नागरी समस्या जाणून घेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. यात नागरिकांचाही सहभाग लाभला होता. प्रभाग निहाय बैठकांमध्ये सर्व स्तरातून सिंगल वार्ड अर्थात एक सदस्यीय प्रभाग रचनाची मागणी झाली. या मागणीसह इतर महत्वाच्या विषयावर विचार विनियम करण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे बैठक झाली. 

मागील महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने चार सदस्यीय प्रभाग रचना केल्यामुळे नाशिकचा विकास होऊ शकला नाही. प्रभागातील कामांमध्ये श्रेय मिळणार नाही तसेच सीमारेषेमुळे प्रभागात कामे झाली नाही असा दावा या राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या नेत्यांनी केला. एक सदस्यीय प्रभाग रचनेत विकास कामे होतात तसेच प्रभागात एकच नगरसेवक असल्याने नागरी समस्या सोडवण्यास वाव मिळत असल्याने नागरिकांच्या हिताकरिता व आपले जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याकरिता सिंगल वार्ड होणे गरजेचे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

सिंगल वार्ड या प्रमुख मागणीसह इतर महत्वाच्या विषयांसाठी नाशिक शहरातील प्रमुख नेतेमंडळी पालकमंत्री छगनराव भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे बैठकीत ठरले.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com