खासगीकरणावर भाजपला महिन्यानंतर कंठ फुटला? 

महापालिकेतील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करण्यामागे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. असा आरोप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नुकताच केला. यासंदर्भात शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले.
Badgujar- Boraste
Badgujar- Boraste

नाशिक : महापालिकेतील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करण्यामागे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. असा आरोप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नुकताच केला. यासंदर्भात शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले. हा आरोप करण्यासाठी महिन्यानंतर कंठ फुटला का ? अशी विचारणा त्यांनी केली. 

शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव भाजपने पुढे आणला होता. त्यात शासनाच्या नगरविकास विभागाने जाचक अटी टाकल्या.  आयुक्तांवर खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी दबाव टाकला. या प्रस्तावामागे शिवसेनेचे मोठे नेते असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यावर नगरसेवक बडगुजर यांनी पलटवार केला. शिवसेनेने भाजपला महिन्याभरानंतर कसा कंठ फुटला, असा सवाल करताना भाजपच्या शिबिरांमधून नगरसेवकांना व्यवस्थीत मार्गदर्शन झालेले दिसत नाही असा टोलाही लगावला. त्यामुळे शिवसेना- भाजपमधील राजकीय वाद तुर्त थांबण्याची चिन्हे नाहीत. 

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वी रद्द करण्यात आला होता. त्यावर सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी यामागे शिवसेना नेते असल्याचा आरोप केला होता. त्याला त्यांनी उत्तर दिले. भाजपमध्ये अभ्यासू नगरसेवक असल्याचे सांगितले जाते. परंतु खासगीकरणाच्या प्रस्तावाबद्दल बोलताना त्यांचे अज्ञान दिसून आले. याचाच अर्थ नगरसेवकांना भाजपच्या बौद्धिक वर्गात चुकीचे मार्गदर्शन होत असल्याचे स्पष्ट होते. शासनाने प्रशासनावर दबाव टाकून प्रस्ताव आणल्याचा आरोप केला. ७ डिसेंबर २०२० ला महासभेत जादा विषयात प्रस्ताव दाखल मान्य करून घेण्यात आल्याचे भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले. याचाच अर्थ विषय पटलावर आला हे सत्य आहे. आमदारांनी आवाज उठविल्यानंतर ठराव रद्द करण्यात आला. त्यानंतर महिनाभरानंतर भाजप नेत्यांना कंठ फुटल्याचा आरोप श्री. बोरस्ते  व बडगुजर यांनी केला.

...तर बिंग फुटण्याची भीती
पटलावर आलेला प्रस्ताव मागे घ्यायचा असेल, तर महासभेत तो चर्चेला आणावा लागते. परंतु सविस्तर चर्चेतून भाजपचे बिंग फुटले असते. यामुळे ठराव परस्पर रद्द करण्यात आला. महासभेत आयुक्तांवर दबाव होता, असे भाजपचे म्हणणे आहे. महासभेत त्यावर सविस्तर विवेचन करता आले असते. खासगीकरणाचा प्रस्ताव आणण्यामागे कोण आहे, हेदेखील सभागृहात समोर आणता आले असते. परंतु अडचणीत येण्याची शक्यता लक्षात आल्याने भाजपने परस्पर प्रस्ताव मागे घेतल्याचे श्री. बडगुजर यांनी सांगितले.
Edited by Sampat Devgire
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com