रानवड साखर कारखाना सक्षम स्थानिक संस्थेने चालवावा - Nashik Political news. Govt Shall select local Agency to run Ranwad Sugar Factory. | Politics Marathi News - Sarkarnama

रानवड साखर कारखाना सक्षम स्थानिक संस्थेने चालवावा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

साखर कारखाना चालवण्यासाठी निफाड तालुक्यातील आर्थिक सक्षम असणाऱ्या संस्थाना चालविण्यासाठी देण्यात यावा. त्यामुळे या संस्था त्याचे आस्थेने त्याचे संगोपन करतील अशी मागणी शेतकरी नेते हंसराज वडघुले यांनी केली आहे. 

निफाड : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखाना पुढील १५ वर्षासाठी भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. हा साखर कारखाना चालवण्यासाठी निफाड तालुक्यातील आर्थिक सक्षम असणाऱ्या संस्थाना चालविण्यासाठी देण्यात यावा. त्यामुळे या संस्था त्याचे आस्थेने त्याचे संगोपन करतील अशी मागणी शेतकरी नेते हंसराज वडघुले यांनी केली आहे. 

कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना (रानवड) गेल्या काही वर्षापासून बंद आहे. हा कारखाना २००६ मध्ये (कै) गोपीनाथ मुंडे यांच्या बैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास सहा वर्षे कालावधीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला होता. त्यानंतर २०१२  मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या  छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग लिमिटेड व त्यानंतर दीनदयाळ कारखान्यास पुन्हा सहा वर्ष कालावधीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला होता. या सर्वांनी सुरवातीचे तीन वर्षे गळीत घेऊन २०१५-१६ च्या हंगामाला कारखाना बंद ठेवला. पुढील वर्षी उपकरारवर द्वारकाधीश साखर कारखान्याला चालविण्यास दिला. एक वर्षाच्या कालावधीत चोविस हजार 631 टन असा अत्यंत अल्प प्रमाणात गाळप करुन या संस्थेनेही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रामणात आर्थिक नुकसान केले. २०१३ ते १८ या कालावधीत कर्मचारी थकीत पगार व इतर शेतकऱ्यांचे व कर्मचारी यांची देणी बाकी आहेत. 

यापूर्वी ज्या संस्थांनी सदरचा कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेतला त्यांनी कारखान्याचे बावीस कोटी शासकीय भाडे व कर्मचाऱ्यांची सतरा कोटींची देणी असे सुमारे ३९ कोटी रुपये अद्याप पर्यंत दिलेले नाहीत. ही बाब न्यायालयीन प्रविष्ठ आहे. साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेणाऱ्या या सर्व संस्था  निफाड तालुक्याच्या बाहेरील होत्या. जिल्ह्या बाहेरील संस्था असल्याने त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यामुळे पुढील १५ वर्षाच्या भाडे करारासाठी पात्र झालेल्या निफाड तालुक्यातील आर्थिक सक्षम असलेल्या संस्थेला रानवड साखर कारखाना सुरु करण्याची परवानगी द्यावी. आत्तापर्यंत शासन शेतकरी व कामगार यांची आत्तापर्यंत झालेली फसवणूक यापुढे होऊ नये. तसेच शेतकरी व कामगार वर्गाची होणारी फसवणूक थांबेल, तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. ज्या कर्मवीरांनी कारखाना स्थापनेसाठी जीवाचे रान केले त्यांच्या कष्टाची चीज होईल.
..

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख