'देवेंद्र फडणवीस साहेब एसीमध्ये बसून आमच्या भोळ्या बापाला वारीचं स्वप्न दाखवू नका...'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या वारीविषयी परंपरा खंडीत होता कामा नये, असे म्हटले आहे. यासंदर्भात छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी त्यांना पत्र लिहिले आहे. वारीबाबत आपण केलेले वक्तव्य पाहता, आपण किमान देहू ते पंढरपूर अशी पायी वारीसोबत चालत जायलाच हवे असे त्यांनी पत्रातम्हटले आहे
Chawa Krantiveer Sanghatna Writes Letter to Devendra Phdanavis
Chawa Krantiveer Sanghatna Writes Letter to Devendra Phdanavis

नाशिक : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या वारीविषयी परंपरा खंडीत होता कामा नये, असे म्हटले आहे. यासंदर्भात छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी त्यांना पत्र लिहिले आहे. वारीबाबत आपण केलेले वक्तव्य पाहता, आपण किमान देहू ते पंढरपूर अशी पायी वारीसोबत चालत जायलाच हवे असे म्हटले आहे. 

छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना 'पंढरपूर वारी" संदर्भात पत्र लिहून काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे या पत्राची चांगलीच चर्चा होत आहे. पत्रात ते म्हणतात, ''फडणवीस साहेब, वारीची परंपरा खंडीत होता कामा नये, असं तुम्ही म्हणताय. हे चांगलेच आहे. सध्याच्या कोरोना संसर्गामुळे अनेक संदर्भ, पंरपरा खंडीत झाल्या आहेत, किंवा त्यात सुधारणा झाल्या आहेत. अशा स्थितीत सामाजिक आरोग्य व सुरक्षीतता लक्षात गेता वारी करावी की नाही यावर मंथन सुरु आहे. त्यात महाराष्ट्रातील वारकरी आज झालेल्या निर्णयानुसार राज्यातील चारही पालख्या बसद्वारे पंढरपूरला नेणार आहेत. त्यामुळे वारीचा विषय टळला. मात्र यावर आपण केलेले वक्तव्य अनेकांना उमगलेले नाही. कारण वारी विषयी यंदा अद्याप पुणे, सोलापूरच्या राजकीय व्यक्तींनी देखील वक्तव्य केलेले नव्हते.''

''वारीची परंपरा खंडीत होऊ नये अेस आपणास वाटते, तर हरकत नाही. वारीच्या आयोजकांसोबत तुम्ही देखील देहू ते पंढरपूर पायी वारी करायलाच हवी. सोबत तुम्ही तुमचे समर्थकही न्या. आम्ही बहुजन शेतकरी प्रत्येक मुक्कामी तुमच्या पोटभर जेवणाची सोय करु. एवढेच नव्हे तर कोरोनाचं संकट असतानाही तुम्ही देहू ते पंढरपूर असे पायी चालणार, याचा अभिमान बाळगत प्रत्येक घरात तुमचा फोटो लावू,'' असे गायकर यांनी म्हटले आहे.

''पण, जर तुम्ही वारीत सहभागी होणार नसाल तर कृपया एसीमध्ये बसून उन्हात राबणाऱ्या आमच्या बापाला वारीचे स्वप्न दाखवू नका. बाप आमचा भोळा आहे, त्याच्या गळ्यावरुन कोरोनाची सुरी फिरवू नका. ही आपणास छावा क्रांतीविर सेनेच्यावतीने विनंती करतो," गायकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com